सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›भ्रष्टाचारी तुपाशी तर आंदोलनकर्ते उपाशी. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड अभय पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू.

भ्रष्टाचारी तुपाशी तर आंदोलनकर्ते उपाशी. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड अभय पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू.

By Satyajeet News
August 19, 2021
855
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०८/२०२१

अनेकवेळा तक्रारी अर्ज देऊनही दखल न घेतल्यानेच बेमुदत उपोषण {अॅड. अभय पाटील.}

पाचोरा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांच्या कामांमध्ये झालेला गैरव्यवहार तसेच अनेक ग्रामपंचायतींच्या दप्तरात अनियमितता व अफरातफर असे प्रकार आढळुन आलेले असतांना त्याबाबत अनेक गावांच्या ग्रामपंचायती विरुद्धचे पुराव्यासह केलेले तक्रारी अर्ज प्रलंबित आहेत.

तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये दारिद्रय रेषेखालील यादीत झालेला घोळ, स्वच्छ भारत मिशन व वैयक्तिक शौचालयाचे लाभार्थींच्या योजनेत गैरव्यवहार पुराव्यानिशी दिसुन आला असतांना देखील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कुठल्याही प्रकरणांची चौकशी न करता सदर झालेल्या गैरव्यवहारातील संबंधितांना ते पाठिशी घालत असल्याचे यावरून दिसुन येत असा आरोप अॅड.अभय पाटील यांनी केला आहे.

गट विकास अधिकारी हे जबाबदार अधिकारी असतांना देखील त्यांनी कुठलीच कारवाई न करता या सर्व प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्यामुळेच व अनेकदा त्यांना याबाबत पुराव्यानिशी तक्रारी देऊनही त्याचा काही एक उपयोग झालेला नसल्याने न्याय मिळण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय शरद पाटील हे तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे.

हे उपोषण दिनांक १७ ऑगस्ट मंगळवारपासून सुरु असून सेनेचे शहराध्यक्ष किशोर बारावकर, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, पं. स. सदस्य ललित वाघ, नगरसेवक विकास पाटील.वडगाव अंबे येथील अॅड.मंगेशराव गायकवाड, वरखेडीचे डॉ. धनराज पाटील, फौजी संजय पाटील व गावागावातील असंख्य शिवसैनिक व ग्रामस्थांनी उपोषणकर्ते अॅड. अभय पाटील यांनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.

पाचोरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हे तालुक्याचे अधिकारी असतांना त्यांना पंचायत समिती स्तरावरील कुठल्याही विभागावर कारवाई करण्याचे अधिकार असतांना त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांना कुठलीच कारवाई न करता रान मोकळे करुन दिले आहे.

तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्र्वर), नगरदेवळा, कोल्हे, डांभुर्णी, वरसाडे, भोकरी, कुऱ्हाड, लोहारा यासह अनेक गावांतील १४ व्या वित्त आयोगाच्या कामांबाबत लेखी तक्रारी पंचायत समितीकडे प्राप्त झालेले असतांनाही सदर विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई या बाबत केलेली नाही, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील घरकुल, विहीरी, शाळेला संरक्षण भिंत अशी कामे केलेली आहेत याबाबत पुराव्यानिशी तक्रारी अर्ज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देवुनही अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही.

यासह तालुक्यातील राज्य शासनांच्या विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची योग्य ती चौकशी करुन यात सहभागी असलेल्या पंचायत समितीतील विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक तसेच या सर्वांना पाठीशी घालणारे पंचायत समितीतील भा.ज.पा. चे सभापती व सदस्य तसेच काही भा.ज.पा. चे जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी संगनमत असलेले गटविकास अधिकारी या सर्वांची चौकशी करून दोषींवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात यावी व यांच्यावर गुन्हे दाखल करुन सखोल चौकशी व्हावी या रास्त मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय शरद पाटील हे तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 50
Previous Article

पाचोरा कॉंग्रेसचा अभिनव उपक्रम, कॉग्रेस आपल्या दारी.

Next Article

स्वातंत्र्यदिना निमित्ताने भडगाव पंचायत समिती शिक्षण विभाग ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआरोग्य

    जागतिक हात धुवा दिन १५ ऑक्टोबर,२०२१ उपक्रमांचा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ.

    October 12, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अध्यक्ष-जयदीप दादा ननावरे याच्या आदेशाने चिंचपुरे येथील आदर्श शेतकरी पुत्र शिवश्री सचिनभाऊ कोकाटे पाटील यांची पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड

    November 6, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोऱ्यात दसरा उद्या येऊन ठेपलायं – आणि आपण काहीतरी विसरलोयं सारखं जाणवतयं !

    October 24, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    सिल्लोड शहरात व सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात नागरीकांनी सर्तक राहाण्याचे पोलीसांनी केले आव्हान.

    December 27, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पो. कॉ. ईश्वर देशमुख यांची जळगाव येथे बदली, पहूर पोलीस स्टेशनकडून निरोप समारंभ संपन्न.

    December 19, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    निसर्गाच्या प्रस्ताने सर्वच मग्न.

    October 23, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात भेसळयुक्त दूधाचा महापूर, सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ.

  • राजकीय

    गुलाबराव भाऊ पाटील समर्थकांनी रस्ता रोको करत संजय राऊतांचा पुतळा जाळून केला निषेध व्यक्त.

  • Uncategorized

    पाचोरा ते अंबे वडगाव रस्त्याच्या कामात ठेकेदारांची मनमानी, रस्त्यावर येणाऱ्या समस्यांमुळे वाहनधारकांच्या डोळ्यात पाणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज