सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध ॲड. अभय पाटील यांचे १५ ऑगस्टला उपोषण.

पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध ॲड. अभय पाटील यांचे १५ ऑगस्टला उपोषण.

By Satyajeet News
August 10, 2021
1007
0
Share:
Post Views: 40
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०८/२०२१

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांच्या कामात गैरव्यवहार तसेच अनेक ग्रामपंचायतींच्या कार्यालयांमध्ये अनियमितता आणि फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड. अभय शरद पाटील यांनी येत्या (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनी न्याय मिळण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

याप्रकरणी, गावांच्या ग्रामपंचायती विरुद्धचे पुराव्यासह तक्रार अर्ज प्रलंबित आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये दारिद्रय रेषेखालील यादीत झालेला घोळ, स्वच्छ भारत मिशन व वैयक्तिक शौचालयाचे लाभार्थींच्या योजनेत गैरव्यवहार पुराव्यानिशी दिसुन आला असतांना देखील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कुठल्याही प्रकरणांची चौकशी न करता सदर झालेल्या गैरव्यवहारातील संबंधितांना ते पाठिशी घालत असल्याचे यावरून दिसुन येत आहे. गट विकास अधिकारी हे जबाबदार अधिकारी असतांना देखील त्यांनी कुठलीच कारवाई न करता या सर्व प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्यामुळेच व अनेकदा त्यांना याबाबत पुराव्यानिशी तक्रारी देऊनही त्याचा काही एक उपयोग झालेला नाही.

दरम्यान, पाचोरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हे तालुक्याचे अधिकारी असतांना त्यांना पंचायत समिती स्तरावरील कुठल्याही विभागावर कारवाई करण्याचे अधिकार असतांना त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांना कुठलीच कारवाई न करता रान मोकळे करुन दिले आहे. तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्र्वर), वरसाडे, भोकरी, कुऱ्हाड, लोहारा यासोबत अनेक गावांतील १४ व्या वित्त आयोगाच्या कामांबाबत लेखी तक्रारी पंचायत समितीकडे प्राप्त झालेले असतांनाही सदर विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई या बाबत केलेली नाही, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील घरकुल, विहीरी, शाळेला संरक्षण भिंत अशी कामे केलेली आहेत याबाबत पुराव्यानिशी तक्रारी अर्ज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देवुनही कुठलीच कारवाई झाली नाही.

यासह तालुक्यातील राज्य शासनांच्या विविध योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचाराची योग्य ती चौकशी करुन यात सहभागी असलेल्या पंचायत समितीतील अधिकाऱ्यांसह गट विकास अधिकारी यांचेवर निलंबनाची कारवाई करावी, या रास्त मागणीसाठी सेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड. अभय शरद पाटील हे (दि. १५) स्वातंत्र्य दिनी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अन मुख्यमंत्री स्वत:ची पाठ थोपटण्यात मग्न आहेत ...

Next Article

अर्ध्यावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी. कुऱ्हाड ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    उपोषणकर्त्याच्या धास्तीने वडगाव आंबे ग्रामपंचायतीला कुलुप. समस्या मांडण्यासाठी ग्रामस्थांनी जावे तरी कुणाकडे.

    June 15, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    बातमी का छापली ? म्हणत वाळूमाफियांची पत्रकारास मारहाण.सत्यजीत न्यूजकडून जाहीर निषेध.

    December 3, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंतुर्ली नंबर एक येथील विवाहित मुलासह आईची विहीरीत उडी मारून आत्महत्या.

    September 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अज्ञात क्रुझरच्या धडकेत पहाण यथील ४६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू.

    June 18, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    July 30, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा वार्ड क्रमांक तेराचे नगरसेवक मा.श्री. विकास पाटील. उद्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर

    November 28, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • कृषी विषयक

    आ.किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश पाचोरा-भडगावात सोमवार पासून भरडधान्य खरेदीला सुरुवात.

  • Uncategorized

    भडगाव, पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घेतली आढावा बैठक.

  • विविध यश, निवड.

    कडे वडगाव येथील पोलिस पाटील सुनील पाटील यांना राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार प्रदान.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज