अर्ध्यावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी. कुऱ्हाड येथील १७ वर्षीय तरूणाचा झोपेतच मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील रहिवाशी श्री.शांताराम मधुकर महाजन यांचा थोरला मुलगा चि.अजय शांताराम महाजन वय १७ वर्षे याचे आज रात्री झोपेतच आकस्मात निधन झाले. सकाळी या मुलाची आई त्यास उठवण्यास गेली असता तो मयत अवस्थेत आढळला. तातडीने त्यास गावातील डॉक्टरांकडे नेले असता मृत घोषित करण्यात आले.
अजय यांच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्या कारणाने अजय शालेय शिक्षण घेत असतांनाच सुटीच्या दिवशी मोलमजुरी करुन घरसंसार चालवण्यासाठी हातभार लावत होता. त्याने नुकतीच इयत्ता दहावीची परिक्षा देऊन चांगले मार्क मिळवून पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून अकरावीत प्रवेश घेऊन भविष्याची स्वप्न रंगवत असतांनाच दिनांक १२ ऑगस्ट सोमवारी सकाळी अजय का उठला नाही म्हणून त्याची आई त्यास उठवण्यासाठी गेली असतांना त्याच्या आईने त्याला जागवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने व आईच्या मनात शंका आल्याने त्याच्या आईने आरडाओरडा करत टाहो फोडला.
लगेचच घरातील इतर सदस्य व गावकरी धावत आले त्यांनी अजयला लगेचच गावातील डॉक्टरांच्या दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करुन तो मयत झाला असल्याचे सांगताच सगळ्यांना धक्काच बसला ही वार्ता गावात पसरताच गावपरिरातून हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोकमय वातावरण निर्माण झाले.
अजय हा गावातील सुज्ञ, सुसंस्कारि, मनमिळाऊ स्वभावाचा व कष्टाळू होता. तसेच तो गावातील सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घ्यायचा विशेष म्हणून हालाखीची परिस्थिती असल्याने मोलमजुरी करुन हा शिक्षण घेत होता. त्याच्या पाश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार असून ऐन उमेदिच्या वयात अजय निघून गेल्याने महाजन परिवारावर दुख्खाचा डोंगर कोसला असून या गरिब परिवारिला समजसेवक, लोकप्रतिनिधी व शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी कऱ्हाड ग्रामस्थांनी केली आहे.