तोरणाळा जंगलात सापडले एक अनोळखी व्यक्तीचे प्रेत. ओळख पटवण्यासाठी पहूर पोलिसांचे आवाहन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०७/२०२१
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ते तोरणाळा रोडवरच असलेल्या घनदाट जंगलात एक अनोळखी प्रेत आढळून आल्याची घटना मंगळवार दिनांक २०/७/२०२१ रोजी अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली, या प्रेताचे वय अंदाजे ३५ असून हातावर गोपाल असे नाव व हनुमंताचा स्टॅचू गोंदलेला आहे. तसेच मनगटावर ओम, पायात काळ्या कलर चा सॅंडल कट बूट असे असून शरीर भयानक अवस्थेमध्ये असल्यामुळे पंचनामा करून जागेवरच शवविच्छेदन करुन त्याच ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या हातून प्रेताचा दफनविधी सुद्धा करण्यात आला आहे.
या संदर्भात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार सुरवाडे, पोलीस नाईक शिंपी हे करीत आहेत. तरी या अनोळखी व्यक्तीच्या संदर्भात कोणाला काही माहिती व ओळख असल्यास पीएसआय अमोल देवढे पोलीस स्टेशन पहूर यांच्याशी ९५५२५२२९०४ या नंबर वर संपर्क साधून पुढील तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत करावी असे आवाहन पहूर पोलिसांनी केले आहे.