दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१२/२०२३

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या दिनांक ०५ डिसेंबर २०२३ मंगळवार रोजी
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे आनंदयात्री परिवार, रोटरी क्लब जामनेर, इंडियन डेंटल असोसिएशन व माणूसकी रुग्णसेवा समुह जळगावच्या वतीने सहा ते दहा वर्षे वयोगटातील मुलींची आरोग्य व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या आरोग्य व दंत तपासणी शिबिरासाठी जामनेर येथील संजीवनी लहान मुलांच्या हॉस्पिटलचे प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल सेठ, स्मित डेंटल क्लिनिक जामनेर चे डॉ. आशिष महाजन यांची उपस्थिती लाभणार असून हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या या शिबिरात मुलींची मोफत तपासणी करणार आहेत. तरी लोहारा व पंचक्रोशीतील पालकांनी आपल्या सहा ते दहा वर्षे वयोगटातील मुलींना लोहारा येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत दुपारी दोन वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत या शिबिरात तपासणीसाठी आणून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.