कोरोना रूग्ण वाढल्यास सर्व शाळा बंद ठेवण्याचा विचार- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील .
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२०२१
गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणावर दिसून येत आहे. आज सायंकाळी देखील १५० हून अधिक रूग्ण संख्या आढळून आल्यास सोमवारपासून पाचवी ते दहावी च्या शाळा बंद ठेवण्याच्या सुचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून दिवसाला १५० हून अधिक कोरोना रूग्ण आढळून येत आहे. त्यामुळे कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. यापार्श्वभूमीवर आज सकाळी अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले की, नागरीकांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी. वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क लावणे, सॅनिटाझरचा वापर करणे या गोष्टींचा अवलंब नागरीकांनी करावा असे आवाहन केले. वेळ प्रसंगी पोलीसांनी देखील मास्क न लावणे व गर्दीच्या जावून दंडात्मक कारवाई करावे, जेणे करून कोरोना लवकरात लवकर आटोक्यात येईल, असे देखील पालकमंत्री ना. पाटील यांनी बोलतांना सांगितले.