मा.तहसीलदारांच्या आश्वासनानंतर नेरीच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठीचे उपोषण सूटले.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील नेरी येथील शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी जम्बो उपोषणाला कॉंग्रेस अध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज सुरवात करण्यात आली होती. या उपोषणाची दखल घेत पाचोरा तालुक्याचे तहसीलदार मा. श्री. कैलासजी चावडे साहेब यांनी तात्काळ कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील नेरी गावातील २०० शेतकऱ्यांची शेती गडद नदीच्या पलीकडे भडाळी शिवारात आहे. गेल्या चार वर्षांत मृद संधारण विभागाने चुकीचा सर्वे करुन बंधारा बांधला त्यामुळे सदरचा रस्ता हा नेरी ते सार्वे ग्रामीण असुन तो पाण्यात गेल्याने अल्पभूधारक शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. या समस्येबाबत वारंवार अर्जफाटे करुन सुध्दा संबंधित विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने व शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून पाचोरा तालुक्याचे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शेतकऱ्यांचे नेते मा. श्री. सचिन दादा सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पीडित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय पाचोरा समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.
या उपोषणाची दखल घेत तहसीलदार मा. श्री. कैलासजी चावडे साहेब यांनी संबंधित विभागाला लेखी आदेश देऊन यात जिल्हा परिषदने पुलासाठी तात्काळ अंदाज पत्रक तयार करून शासनाकडे पाठवण्यात येवुन मृद संधारण विभागाने तात्काळ चौकशी करावी तसेच स्व. धर्मा बेडर यांना मुख्यमंत्री सहायता निधी मधुन मदत करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात येईल असे आश्वासन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना दिले.
यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शेतकरी नेते मा. श्री. सचिन सोमवंशी यांनी उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार श्री. कैलास चावडे यांच्याशी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून सांगत त्या कशा सोडवता येतील याबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेत समाधानकारक चर्चा होऊन आम्ही लवकरात, लवकर मृद संधारण विभागाकडून सत्य परिस्थिती समजून घेत तुमची समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन दिल्यानंतर मा. श्री. तहसीलदारांच्या हस्ते शेतकरी नेते मा. श्री. सचिन दादा सोमवंशी यांना व शेतकऱ्यांना सरबत सरबत देऊन उपोषण सोडवले.
यावेळी मृद संधारण चे उपविभागीय अभियंता एस डी निकम, नायब तहसीलदार संभाजी पाटील, शिवसेनेचे शेतकरी प्रमुख अरुण पाटील, हरीभाउ पाटील, राजेंद्र महाजन, इरफान मनियार, शरीफ शेख, राहुल शिंदे उपस्थितीत होते. नेरी येथील शेतकरी काशिनाथ अहीरे, बंटी भोई, याकुबखा पठाण, सुनिल पाटील, विजय सुर्यवंशी साहेबराव बोरसे, आधार गढरी, दादाभाऊ मोरे, हेमराज बोरसे, सुरेश गढरी, जिभाउ पाटील, मुकुंदा पाटील, विमलबाई अहीरे, सकुबाई भोई, सरुबाई पाटील, दगुभाई भोई, शरीफाबाई पठाण, मालाताई मोरे.. बालु भोई.. बंडु भोई.. तुकाराम भोई.. भगवान भोई.. आदींसह शंभरहून अधिक पिढीत शेतकरी उपस्थित होते.