कोल्हे येथील सासरच्या लोकांनी केला गिरड येथील जावायाच्या घरावर जीवघेणा हल्ला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०१/२०२४
भडगाव तालुक्यातील गिरड येथील रहिवासी अनिल देविदास काळे यांची सासरवाडी कोल्हे येथील असून कोल्हे येथील रहिवासी श्रीराम पांडुरंग कांबळे हे सासरे आहेत. अनिल काळे याला दोन मुले असून त्यांची पत्नी यांचा वाद सुरु असून त्या मागील दिड वर्षांपासून कोल्हे येथे माहेरी रहात आहेत. आपल्या मुलीला वागवत नाही व दुसऱ्या मुलीशी रिलेशनशिप करुन घरात ठेवून मौजमजा करत असल्याचा राग डोक्यात ठेवून काल रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास श्रीराम पांडुरंग कांबळे, विजय श्रीराम कांबळे, गजानन श्रीराम कांबळे, राजु श्रीराम कांबळे, लक्ष्मीबाई श्रीराम कांबळे, जयश्री विजय कांबळे राजु कांबळे व अनिल याची पत्नी अर्चना व इतर समाजातील ५ ते ६ इसमांनी लाठ्याकाठ्या व कोयते हातात घेऊन जोरदार हल्ला चढवला यावेळी काळे कुटुंबीयांना याची पूर्वकल्पना नसल्याने ते या अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे भांबावून गेले व आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. तेव्हा गावातील काही लोक येत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी पळ काढला.
या हल्यात जनाबाई सुखदेव काळे, सुनंदा मंगेश पवार प्रकाश सुखदेव काळे व अनिल देविदास काळे, प्रणिती सुभाष पाटील, अनिल देविदास काळे, दिपक देविदास काळे, धोंडाबाई बाबुलाल भालेराव, निलाबाई देविदास काळे यांच्या डोक्याला व इतर ठिकाणी जबर मारहाण करण्यात आली असल्याने त्यांनी लगेचच भडगाव पोलीस स्टेशनला जाऊन रितसर तक्रार दाखल केली आहे. भडगाव पोलिसांतर्फे रितसर तक्रार दाखल करुन घेत जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
*गळा कापला खोकला मिटला हे ध्येय होते*
महत्वाचे म्हणजे या हल्यात अनिल देविदास काळे यांच्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेला जीवे मारण्याचा कट रचला होता अशी माहिती समोर येत असून संबंधित मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.