नांद्रा येथे दिडशे वर्षाची परपंरा आज ही कायम श्रावण महिन्यात असते मांसविक्री बंद.
प्रा.यशवंत पवार (नांद्रा)
पाचोरा(वार्ताहार)-
येथे इंग्रजी राजवटी पासून प्राचीन काळातील सुमारे दीडशे वर्षापूर्वीचे शके १८३० स्थापना असलेले महादेव महाराजांचे व्दिपींडी मंदिर असून या ठिकाणी ऐतिहासिक कालखंडापासून पारंपारिक पद्धतीने श्रावण मास सुरू झाल्यापासून तर समाप्तीपर्यंत व त्यानंतर पोळ्याच्या दिवशी गावातील हरी नाम संकिर्तन सप्ताह प्रारंभ झाल्यापासून पुढील सप्ता समाप्ती पर्यंत म्हणजेच एकूण सव्वा महिना नांद्रा गावात व नांद्रा गावाची शिवार असे पर्यंत कुठेही मास विक्री ,मास खाणे ,मास शिजवणे याला पूर्णपणे आजही बंदी कायम आहे .आणि असं कोणी जर केलेच तर त्याला महादेव मंदिरा वर मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
हा नियम अद्यापही सगळे ग्रामस्थ हा नियम काटेकोरपणे पाळतात. कारण येथील महादेव महाराज हे नांद्रा गावाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक असलेले ऐतिहासिक व्दिपींडी जागृत शक्तीस्थान देवस्थान आहे. यासाठी या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविकभक्त आपल्या मनातली इच्छा येथे मंदिरात येऊन प्रकट करतात व त्या निश्चित पूर्णत्वास येत असल्याची भाविकांचि श्रद्धा असल्याने ते पुढे मनातली मानता सिध्द झाल्यावर स्वइच्छेने नवस फेडण्यासाठी देणगी स्वरुपात रक्कम,वस्तू ,नारळ पोते किंवा गुप्तदान करुन देवाचे रुण व्यक्त करतात.
याबरोबरच श्रावण महिन्यात विशेष करून सर्व श्रावण सोमवार व्रतवैकल्ये,उपासना,पूजाअर्चा मंदिराच्या पिंडीजवळ करून भक्त मनोभावे सेवा करून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवाला साकडे घालत असतात .म्हणून आजही नांद्रा येथील दीडशे वर्षाची प्राचीन पारंपारिक परंपरा आज ही अबाधित आहे.