कुऱ्हाड खुर्द येथे रानडुक्कराच्या हल्यात गुराखी जखमी, मदतीसाठी धावले शिवसेना जिल्हा प्रमुख.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०७/२०२१
कुऱ्हाड येथील जब्बार समसुद्दिन तडवी हे शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण पाटील यांच्या शेतात काम करतात. असेच शनिवार दिनांक ०३ जुलै रोजी कुऱ्हाड शिवारातील शेतशिवारात शेतात काम करत असतांना दुपारी अंदाजे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास जब्बार तडवी यांच्यावर रानडुकराने अचानक हल्ला चढवला हल्ला, चढवतात जब्बार तडवी हे जमिनीवर पडले डुकरापासून बचाव करण्यासाठी त्यांनी आरडाओरड केल्याने आसपासच्या शेतातील शेतमजूर व इतर गुराख्यांनी आरडाओरड करत डुकराला हाकलून लावले यामुळे जब्बार तडवी हे बालबाल बचावले.
या घटनेची माहिती मिळताच गावातील लोकमतचे पत्रकार सुनील लोहार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने पाचोरा येथे नेऊन उपचार केले.
कुऱ्हाड, कळमसरा, लोहारा, कोकडी तांडा, मालखेडा, आंबे वडगाव, म्हसास या गावांच्या शेतशिवारात रानडुकरांनी व निलगायींनी उच्छाद मांडला असून रानडुकरांच्या भीतीमुळे मजूर शेतात येण्यासाठी धजावत नसल्याने मजूर शेतीची मशागत कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
यासाठी वन विभागाने राखीव जंगलाचे सरहद्दीवर व कक्षेत सुरक्षा सीमारेषा निश्चित करुन पाच फुट रुंदीची व तिन फुट खोल चारी खोदल्यास जंगली प्राणी शेत शिवारात येणार नाहीत. व पाळीव प्राणी राखीव जंगलात जाणार नाहीत. म्हणून आहे त्या खोदलेल्या जून्या चाऱ्यांची माती काढून नसेल त्या ठिकाणी नवीन चाऱ्या खोदून जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांक व शेतकऱ्यांकडून होत आहे.