जगविख्यात कलामहर्षी केकी मूस संकेतस्थळाचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.
दिलीप जैन.(पाचोरा(
दिनांक~३१/१२/२०२०
*बाबूजींचा अनमोल ठेवा एका क्लिक वर जगासमोर येणार असल्याचा आनंद* — *खासदार उन्मेश दादा पाटील*
————————–
चाळीसगांव — आपल्या विविध कलांनी अवघ्या जगाला भुरळ घालणारे जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस यांच्या जीवनावर आधारित संकेतस्थळाचे लोकार्पण
(www.kekimoosfoundation.org) आज खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. *वर्ल्ड प्रेस प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या अमेरिकन थीमच्या धर्तीवर साधी आणि सरळ माहिती मिळेल अशा पद्धतीने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचा लोकार्पण होत असल्याने बाबूजींच्या अनमोल कलाकृती साऱ्या विश्वाला एका क्लिक वर पाहता येणार असल्याचा आनंद आहे अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे*. याप्रसंगी केकी मूस प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकनराव गायकवाड, सचिव कमलाकर सामंत,ज्येष्ठ पत्रकार भिकन वाणी, अनंत सामंत , युवा छायाचित्रकार निलेश काकडे ,केकी मूस आर्ट गॅलरीचे व्यवस्थापक मनोज घाटे, माजी पंचायत समिती सदस्य जगन आप्पा महाजन,वास्तू विशारद किरण दादा देशमुख, कल्पतरू हॉस्पिटल संचालक डॉ. तुषार राठोड ,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन,उदय दादा पवार, पी.यू. पाटील सर , विकासक रवींद्रभाऊ शुल्क, बंडूभाऊ पगार, उद्योजक योगेश चौधरी, छोटू महाराज तरवाडे, मामासाहेब पिंप्रिकर, जितु राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी या संकेतस्थळामध्ये बाबूजींच्या सहवासात आलेल्या व्यक्तींच्या चलचित्र प्रतिक्रिया समावेश कराव्यात अशी सूचना करीत प्रतिष्ठानच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
*प्रतिष्ठानच्या वतीने खासदारांचा सत्कार*
खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून नवीन संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली असून बंगल्या शेजारी तत्कालीन आमदार तसेच विद्यमान खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून तीन मजली इमारती चे बांधकाम पूर्ण झाले आहे. येथे येणाऱ्या कलाकारांना बाबूजींच्या सर्व माहितीचे संकलन नविन इमारतीत करून ठेवल्याने चित्रकलेचा व शिल्पकलेचा वारसा पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार असून नवीन विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. तसेच समृध्द ग्रंथालय विभाग, कॉन्फरन्स हॉल, गरजेच्या समयी कलाकारांना राहण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे त्यामुळे याठिकाणी वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहतील व एक आगळे वेगळे व्यासपीठ भावी चित्रकारांना उपलब्ध होईल. या साठी नवीन इमारतीची मोठी मदत होणार असून यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणारे खासदार उन्मेश दादांचे प्रतिष्ठान सदैव ऋणी राहील असे गौद्गागार संस्थेचे सचिव कमलाकर सामंत यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष भिकन गायकवाड सर यांच्या हस्ते खासदार उन्मेश दादा यांचा सत्कार करण्यात आला.