हिवरा नदीवरील पूल बांधणे गरजेचे, मात्र अगोदर पर्यायी व्यवस्था न केल्यास आंदोलन.अनिल महाजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०७/२०२१
पाचोरा हिवरा नदी पूल बांधण्यात येत आहेत.हे काम करत असतांनाच याच परिसरातील पाचोरा शहराला जोडल्या जाणाऱ्या दुसऱ्या पुलाचेही काम हाती घेतल्याने पाचोरा शहरात जाण्यासाठीचा कमी अंतराचा रस्ता बंद झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.
पुलाचे काम सुरु असतांनाच या कठीण रस्त्यावरून पाचोरा शहरात जातांनाचे हे दृश्य.
ही समस्या लक्षात घेत अनिल महाजन यांनी पाचोरा नगरपालिका प्रशासन व ठेकेदार यांना दहा दिवसाचा अल्टिमेट देत तात्काळ नागरिकांसाठी पर्यायी कच्चा रस्ता करावा तरच पुलाचे पुढील काम सुरू करावे अन्यथा ए.एम फाऊंडेशन कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास स्थानिक नगरपालिका प्रशासन व ठेकेदार जबाबदार राहतील असे नमुद केलेले मागणीपर निवेदन नगरपालिका व संबंधित ठेकेदारांना दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहराला जोडणाऱ्या कुष्णापुरी हिवरा नदीच्या पुलाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे काम सुरु झाल्यापासून पर्यायी रस्ता नसल्याने कुष्णापुरी, सिंधी कॉलनी, भैरव नगर त्रंबक नगर, गुरुदत्त नगर भागातील, रहिवाशांची दैनंदिन जीवनावश्यक कामानिमित्त पाचोरा शहरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
नगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार यांनी पुलाचे कामास सुरवात करण्याआधी या रस्तावरील रहदारी किती प्रमाणात व किती महत्वाची आहे व पुलाचे काम सुरु केल्यानंतर येणाऱ्या अडीअडणींचा कोणताही अभ्यास न करता पर्यायी व्यवस्था म्हणून पादचाऱ्यांना जाण्या,येण्यासाठी तात्पुरता लोखंडी पुल (साकड) तयार करुन पुलाचे कामास सुरवात करणे गरजेचे होते. मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता पुलाचे बांधकाम हाती घेतल्याने वरिल परिसरातील तसेच शहराच्या पुर्वेकडील गावातील जनतेला पाचोरा शहरात येण्यासाठी अडचण निर्माण झाली असून इतर रस्त्याने शहरात जाण्यासाठी आर्थिक भूदंड सहन करावा लागत आहे.
जनतेचे होणारे हाल व गैरसोय लक्षात घेऊन ए.एम.फांऊंडेशनचे मा.श्री. अनिल महाजन यांनी पुलाचे बांधकाम करण्याआधी जनतेच्या हितासाठी व त्यांची गैरसोय दुर व्हावी म्हणून पाचोरा प्रांताधिकारी मा.श्री. राजेंद्रजीकचरे साहेब व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर मॅडम यांना निवेदन देत पुलाचे बांधकाम गरजेचे आहे. मात्र पुलाचे बांधकाम करण्याआधी नगरपालिका प्रशासनाने जनतेच्या दैनंदिन व अत्यावश्यक गरजांचा आभ्यास न करता भर पावसाळयात पुलाचे बांधकाम हाती घेणे जनहिताचे धोरण होऊच शकत नाही.म्हणून येत्या दहा दिवसात जनतेसाठी अगोदर लोखंडी पुल (साकड)पुल तयार करुन द्यावा अन्यथा ए.एम फाऊंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत. या आंदोलनाच्या वेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नगरपालिका प्रशासन व ठेकेदार जबाबदार राहतील असे नमूद केले असून पर्यायी व्यवस्था न झाल्यास आंदोलन होईलच असे स्पष्ट केले आहे.
मा.श्री. अनिल महाजन यांनी जनतेसाठी घेतलेली भुमिका व आंदोलनाला पाचोरा शहरासह पुर्वेकडील खेडेगावातील जनतेने पाठिंबा दर्शविला आहे.