खरकटे वेचवया गेले ते कावळे, रणीझुंजाया राहीले ते मावळे.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०७/२०२२
महाराष्ट्रातील आजच्या चाललेल्या राजकीय नाट्यावर बोलतांना अंबे वडगाव येथील संतोष पाटील.
ज्येष्ठ विधीतज्ञ शरद (आण्णा) पाटील( शिंदाडकर) यांचं हे वाक्य आज तंतोतंत खरं ठरत आहे, मित्रहो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हे काय चाललं आहे, सत्तेसाठी ही लोक आपला इमान, आपला मान, सन्मान, आत्मभान, सार काही गहान ठेवून लाचार होऊन खरकटे वेचण्यासाठी धडपड करत आहे, या समाजसेवेच सोंग घेतलेल्या बहुरूपी राक्षसांना राष्ट्रहित, समाजहित, कशात दडले आहे हेच कळत नाही, निव्वळ सत्ता खुर्ची यासाठीच सगळं रामायण झालेल आहे मित्रहो काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे या देशावर असलेलं कर्ज, बंद पडत चाललेले उद्योग, विकल्या गेलेल्या सरकारी कंपन्या ,रुपयाचं होणार अवमूल्य, घटत चाललेला जीडीपी, शेजारील देशांची अतिक्रमण, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, व महागाईचा भस्मासुर, जीएसटी सारखा अत्याचारी कर, व शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या ,या सगळ्या गोष्टींचा आपण विचार का करत नाही, आपण विचार काय करतोय तिकडचे आमदार इकडे आले इकडचे आमदार तिकडे गेले, यांचं सरकार आलं त्यांचं सरकार पडलं, या अशा विचारांन व चर्चेन या देशाच वाटोळ होत आहे. कुठलाही राजकीय पक्ष असो त्याच्यामध्ये काही गद्दार तर काही निष्ठावंत कार्यकर्ते असतातच, या गद्दार राजकीय नेत्यांना धडा शिकवून प्रामाणिक अशा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची नितांत गरज आहे, या अशा लोकांना साथ देऊन या बिकट परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढता येईल अन्यथा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही…
संतोष पाटील
७६६६४४७११२