पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भगवान भोये रुजू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला मागील काही वर्षापासून बदल्यांचे ग्रहण लागले असून या पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकापैकी काही सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी कौतुकास्पद कामगिरी करुन आपला कार्यकाळ पूर्ण केला व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपल्या कामाची छाप सोडून बदलून गेले.
मात्र काही सहाय्यक पोलीस निरीक्षक या पोलिस स्टेशनमध्ये अपवाद ठरले असून काही कारणास्तव कार्यकाळ संपण्याआधीच काहीना काही कारणाने त्यांची बदली झाल्यामुळे त्याजागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.
असाच काहीसा प्रकार आताही घडला आहे. अंदाजे मागील अकरा महिन्यापूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले मा.श्री. रविंद्रजी बागुल यांची काही कारणास्तव तडकाफडकी बदली झाली होती. यांची बदली झाल्यानंतर त्यांचे जागेवर सौ.निताजी कायटे यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारला होता.
परंतु कर्तव्यदक्ष सौ.निताजी कायटे यांनी पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारल्यावर गावागावात जाऊन समस्या समजावून घेत अवैधधंदे व समाजासाठी घातक व शांतता भंग होईल असे प्रकार घडू नयेत म्हणून जनसंपर्क वाढवून चांगल्याप्रकारे कामकाज सुरु असतांनाच अकरा महिन्याचा कालावधी होत नाही तोवरच दिनांक २४ ऑगस्ट मंगळवारच्या मध्यरात्री त्यांची कासोदा पोलिस स्टेशनला बदली झाल्याचे माहित झाले असून त्यांचे जागेवर भुसावळ येथून मा.श्री. कृष्णा भगवान भोये यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज चार वाजेच्या सुमारास पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला हजर होऊन पदभार स्विकारला असल्याचे खात्रीपूर्वक समजले आहे.
तसेच या नव्यानेच बदलून आलेल्या अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कुणाच्याही दबावाला बळी न पडता गावागावात सुरु असलेले सट्टा, पत्ता, जुगाराचे अड्डे, अवैध दारु विक्री हे अवैधधंदे बंद करून सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय द्यावा व पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखणे कामी तत्पर रहावे अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.