महाराष्ट्र कृषी दिनानिमित्ताने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०६/२०२१
पेण १ जुलै रोजी राष्ट्रीय चिकित्सक दिन तसेच महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा खालापूर तसेच वन परिमंडळ शिरवली यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर उपक्रम वन परिमंडळ शिरवली मौजे वावोशी येथील गट नंबर ६६, सर्वे नंबर २६७ या संरक्षीत वन असलेल्या जागेत करण्यात आला असून ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी वनपाल पी. एच. भायपाटील यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला. तसेच वनरक्षक व्ही.जी.कटवटे यांनी लावण्यात येत असलेल्या झाडांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. संघटनेचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष शेवाळे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविला जात असल्याचे सांगत वृक्षांचे मानवाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे हे पटवून दिले.
तसेच प्रत्येक ग्रामस्थांनी एक तरी वृक्ष लावावे व त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी वन परिमंडळ शिरवलीचे वनपाल पी. एच. भायपाटील, वनरक्षक व्ही.जी.कटवटे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष संतोष शेवाळे, पदाधिकारी राजू भंडारी, गणेश मोरे, जतीन मोरे, तसेच वावोशी सरपंच प्रभाकर छत्तीसकर, पोलीस पाटील मनीष हातनोलकर, महेश गुरव, आकांक्षा गुरव, कावेरी भंडारी, सोनाली भंडारी, साक्षी पाटील, किशोर आढावकर, संदीप आंबेरकर, वसंत वालम, पांडुरंग हातनोलकर, तात्या चोरगे, आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.