गुरांचा बाजार बंद पण व्यापार सुरु, गुरे वाहतूकीला बंदी घालावी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०९/२०२२
सगळीकडे लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले असल्याने महाराष्ट्रात सगळीकडे गुरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. परंतु तरीही जळगाव जिल्ह्यात ज्या, ज्या ठिकाणी गुरांचा बाजार भरतो त्या, त्या ठिकाणी मार्केट यार्डात गुरांचा बाजार बंद असलातरी काही व्यापारी व दलाल भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बाजार कमेटीच्या मार्केटच्या बाजूला जागा उपलब्ध होईल तेथे अनाधिकृत बाजार भरवून व्यापार करत आहेत.
विशेष म्हणजे या चोरटी गुराढोरांची देवाण-घेवाण करण्यासाठी चार चाकी वाहनातून गुरांची वाहतूक केली जात असून या तालुक्यातील गुरे त्या तालुक्यात तर कधी तालुक्यातील गुरे जिल्हा पातळीवर तसेच मराठवाड्यात वाहतूक केली जात असल्याने लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून गुराढोरांची वाहतूक बंद करणे हा एकमेव पर्याय असल्याने ही वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिक तसेच पशुधन पर्यवेक्षक यांनी केली आहे.