पाचोरा तालुक्यात डेटोनेटर कॅप व जेलेटीन तोटीचा, मासेमारीसाठी वापर जिवीतहानी होण्याची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०४/२०२२
पाचोरा व जामनेर तालुक्यात दगड फोडण्यासाठी लागणारी स्फोटके म्हणजे जेलेटीन तोटी व डेटोनेटर कॅपची खुलेआम विक्री होत असल्याने या स्फोटकांचा वापर मासेमारी करण्यासाठी होत असल्याने सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण डेटोनेटर कॅपचे अधिकृत विक्रेते हे पैसे कमावण्याच्या नादात जो जास्त पैसे देईल त्याला डेटोनेटर कॅप व जेलेटीन तोट्या विकत आहेत. परंतु ही घातक स्फोटके खुलेआम मिळत असल्याने या स्फोटकांचा गैरवापर होऊन एखाद्यावेळी मोठा अनर्थ घडू शकतो अशीही भिती व्यक्त करण्यात येत आहे. कारण मागील काही वर्षांपूर्वी डेटोनेटर कॅप व पेट्रोलने भरलेल्या बाटलीचा वापर करत पेट्रोल बॉंब बनवण्यात आल्याच्याही घटना घडलेल्या आहेत.
विशेष म्हणजे ह्या स्फोटकांची विक्री करणारे लायसन (परवाना) धारक स्फोटकांची विक्री करतांना जेलेटीन तोटी व डेटोनेटर कॅप कोण घेतय, कशासाठी घेतय, स्फोटके घेणारा व्यक्ती शेतकरी आहे का ? तो खरच विहीर फोडण्यासाठी याचा वापर करणार आहे का ? किंवा ज्यांनी स्फोटके विकत घेतली आहेत त्या स्फोटके घेणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून त्यांच्या नावाची नोंद ठेवणे बंधनकारक असल्यावरही अशी नोद घेतली किंवा ठेवली जात नसल्याने ( अशा स्फोटक विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.)
विशेष म्हणजे डेटोनेटर कॅप व कणीक म्हणजे गव्हाचे पीठ वापरुन रानडुक्कर व निलगायीची शिकार केली जात आहे. रानडुक्कर व निलगायीची शिकार करण्यासाठी गव्हाचे पिठ भिजवून कणकेचा गोळा तयार केला जोतो नंतर या कणकेच्या गोळ्यात डेटोनेटरची कॅप ठेवून हे कणकेचे गोळे ज्या जंगल परिसरात रानडुकरे व निलगायी म्हणजे (रोही) आहेत त्या जंगलातील कुरणात किंवा जलाशयाजवळ हे गोळे टाकण्यात येतात. नंतर रानडुकरे व निलगायी आपल्या अन्नाच्या शोधत फिरत असतांना हे कणकेचे गोळे खातात. हे गोळे खात असतांनाच डेटोनेटर कॅप ही त्यांच्या दाताखाली आल्यावर घर्षण होऊन त्या डेटोनेटर कॅपचा स्फोट होतो या भयंकर स्फोटामुळे रानडुक्कर व निलगायीचा जबडा फाटून तोंडाचा व डोक्याचा भाग छिन्नविच्छिन्न होऊन हे प्राणी मरतात नंतर यांचे मास काढून हे मास विक्री करुन शिकार करणारे शिकारी पैसा कमावत आहेत. या प्रकारामुळे वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे.
(तसेच हाच डेटोनेटर कॅप असलेला कणकेचा गोळा पाळीव जनावरांच्या खाण्यात आल्यास पाळीव जनावरांची जिवीतहानी होऊ शकते.)
असाच स्फोटकांचा वापर करुन काहीसा गैरप्रकार सुरू असून सद्यस्थितीत वाढत्या उन्हाळ्यात लहानमोठे जलसाठे, पाझर तलाव, नालाबांध, पाझर तलाव, लहान, लहान धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. याचाच फायदा घेत काही मासेमारी करणारे व्यवसायीक थोड्या श्रमात व अल्प वेळात मासेमारी करण्यासाठी डेटोनेटर कॅप व जेलेटीन तोटीचा वापर करत जलाशयात स्फोट घडवून घातक पध्दतीने मासेमारी करत असल्याचा नवीन प्रकार समोर आला आहे.
या घातक प्रकारे होत असलेल्या मासेमारीमुळे जलाशयातील पाणी अशुद्ध होत असून हे पाणी प्यायल्याने पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत असून गाभण गायी, म्हशींना त्रास होत असून गायी, म्हशीच्या गर्भावर दुष्परिणाम होऊन गर्भपात होत आहेत. तसेच इतर पाळीव प्रणी हे पाणी पित असल्याने अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याने पशुधन पालक चिंतीत झाला असून स्फोटके वापरुन केली जाणारी मासेमारी त्वरीत थांबवण्यात यावी अशी मागणी होत आहे.