अल्पवयीन तरुणीला पळवून नेत लैंगिक अत्याचार व मारहाण प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल पाचोरा तालुक्यातील घटना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०७/२०२३
सद्यस्थितीत सगळीकडे अल्पवयीन मुलींना पळवून नेत लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. अशीच एक घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खेडेगावात घडली असून जळगाव येथील एका तरुणाने खेडे गावातील १७ वर्ष ०७ महिने वयाच्या अल्पवयीन तरुणीला पळवून नेत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले हा तरुण येथेच थांबला नाही तर त्याने दारु पिऊन दारुच्या नशेत तरुणीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोस्को अंतर्गत भादंवि कलम ३७६, ३६३ नुसार रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी संशयित तरुणाला दिनांक २१ जूलै २०२३ शुक्रवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पुण्यातून तरुणीसह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की संशयित तरुण गोपाल रामचंद्र माळी (वय २८ वर्षे) राहाणार शांतिनारायण नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव हा पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात घराची फर्शी (स्टाईल) बसवण्याच्या कामानिमित्त आला होता. या कामानिमित्त आलेल्या तरुणाने ज्या घरात आला होता त्याच घराण्यातील एका १७ वर्षे ०७ महिने वयाच्या तरुणीला पळवून नेत दिनांक २९ जून २०२३ ते २० जूलै २०२३ पावेतो पळवून नेलेल्या तरुणीवर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या घरी व पुण्यातील वाघोली येथे जबरी लैंगिक अत्याचार केले तसेच दारु पिऊन सतत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
या गैरप्रकाराबाबत तरुणीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर संशयित आरोपीला पुणे येथुन अटक करुन त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश मा. श्री. शरद पवार यांनी संशयित आरोपीला दिनांक २५ जूलै २०२३ मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारतर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.