कोल्हे येथे कापूस गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन व डोमकळी ओळख व निर्मूलनासाठी वर्ग संपन्न.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन, ओळख व निर्मूलन या विषयावर विशेष शेती शाळा वर्ग घेण्यात आला या शेतीशाळा वर्गामध्ये जळगावचे उपविभागीय कृषी अधिकारी मा.श्री. अजयजीभोकरे यांनी शेतकऱ्यांना कापसावरील बोंड अळी कशी ओळखावी तसेच डोमकळी शोधून तिचे निर्मूलन कसे करावे याविषयी अभ्यासपूर्ण सविस्तर माहिती देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून कापूस पिकावरील फवारणी व इतर खर्चाची बचत होणार आहे.
गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन डोमकळी ओळख व निर्मूलन याबद्दल सविस्तर माहिती देतांना उपविभागीय कृषी अधिकारी जळगाव मा.श्री.अनिलजी भोकरे साहेब.
Download WordPress Themes Nulled and plugins.