सावखेडा मंदिरातून चोरी,एका संशयितास ताब्यात घेतल्याची चर्चा. कर्ता एक तर करविता धनी दुसराच असल्याने सखोल चौकशीची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०१/२०२२
(जळगाव एल.सी.बी. च्या कामगिरीचे जनमानसातून कौतुक)
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील पिंपळगाव हरेश्वर येथून अंदाजे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेडा तालुका पाचोरा येथील जागृत व प्रसिद्ध लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान आहे. या तिर्थस्थळी दरवर्षी पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी यात्रा भरत असते व यात्रेत महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश, गुजरात व इतर राज्यातील भाविक, भक्त या ठिकाणी येऊन दाळ बट्टीचा नैवेद्य देऊन नवस फेडतात.
परंतु कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे मागील वर्षांपासून सावखेडा येथील भैरवनाथ बाबांचा यात्रा उत्सव बंद असून यावर्षीही यात्रा उत्सव बंद असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट असल्याने या संधीचा फायदा घेत भैरवनाथ मंदिरातून दिनांक ११ जानेवारी मंगळवार रोजी रात्री १०.३० ते १२ रोजी रात्री १२.१२ वाजण्याच्या दरम्यान भैरवनाथ मंदिराच्या उत्तर बाजूला कुलूप नसलेल्या लोखंडी चॅनल गेट तोडून अज्ञात चोरट्याने आतील साहित्य मिळून ६६ हजार रुपयांची चोरी केली आहे.
या मंदिराच्या आत प्रवेश करून चोरट्याने गाभाऱ्याच्या दक्षिण बाजूच्या लोखंडी दरवाजाला आतून कडी लावली नसल्याने, त्या वाटेने गाभाऱ्यात प्रवेश करून मंदिरातील दानपेटीतील १०० रुपये व ६६ हजार रुपये किमतीच्या, प्रत्येकी ७०० ग्रॅम वजनाप्रमाणे २२ हजार रुपये किमतीचे चांदीमिश्रित धातूची छत्री, याप्रमाणे नागाचे चित्र असलेल्या ३ छत्र्या एकूण २ किलो १०० ग्रॅम वजनाच्या ६६ हजार रुपये किमतीच्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत.
याबाबतची फिर्याद पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला प्रकाश नारायण परदेशी यांनी चोरी दिली असून या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरीप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय माळी हे करीत आहेत.
हा तपास सुरु असतांनाच या चोरी प्रकरणी जळगाव एल.सी.बी. पथकाने वरखेडी येथून जवळच असलेल्या एका खेडेगावातील एका संशयितास ताब्यात घेतले असल्याची चर्चा पिंपळगाव हरेश्वर, सावखेडा, वरखेडी, लासुरे, भोजे, चिंचपूरे, लोहारी व पंचक्रोशीतील गावागावातून ऐकावयास येत असल्याने लवकरच चोरांना जेरबंद करुन धार्मिक स्थळी झालेली चोरी उघड होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाचे~कर्ता एक तर करविता दुसराच असण्याची शक्यता ?
तसेच चोरी झाली तेव्हा मंदिरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुरु होते या कॅमेऱ्यात चोरटा दिसत असून त्याने तोंडाला कापड बांधलेले असल्याने त्याची ओळख पटवणे हे पोलिसांपुढे एक आव्हानच आहे. मात्र एकीकडे चोरी होत असतांनाच दुसरीकडे याच परिसरात कुणीतरी भ्रमणध्वनीवर संभाषणात गुंग होते असेही जनमानसात चर्चीले जात असल्याने चोरी झाली त्या वेळेतील मंदिर परिसरातील टावर लोकेशन काढून चोरीची घटना घडत असतांना कोणकोणते भ्रमणध्वनी सक्रिय होते याची माहिती काढणे गरजेचे आहे.
(सावखेडा येथील श्री. भैरवनाथ बाबांचे देवस्थान हे सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी मागील काळात एका चोरट्याने मंदिरातील घंटा चोरुन नेला होता परंतु घंटा चोरुन शेतांना काही अंतरावर गेल्यावर चोरट्याची बोलती बंद झाल्याने त्याने तो घंटा जागेवरच सोडून पळ काढला होता तर दुसऱ्या एका चोरीच्या घटनेत श्री. भैरवनाथ बाबांचे मुकुट पितळाचे असल्यावर ते सोन्याचे आहेत असे समजून एक चोरट्याने मुकुटांची चोरी केली होती मात्र मुकुट चोरुन नेत असतांनाच दैवी चमत्कार म्हणा किंवा काही समजा चोरटा काही अंतरावर चालत गेल्यावर त्याला समोर काहीच दिसेनासे झाल्यामुळे त्याने ते मुकुट जागेवरच सोडून पलायन केले होते. असी जेष्ट नागरिक माहिती सांगतात.)
तदनंतर सन १९८७ मध्ये या मंदिराचा कारभार पहाण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आले. ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर मंदिराच्या परिसरात सुरक्षा व इतर सुखसुविधा उपलब्ध करण्यात आल्यानंतर हा पहिलाच चोरीचा प्रकार घडला आहे.