लोहारा येथील तलाठी शेख यांची करामत,जिवंत शेतकऱ्याला दाखवले मयत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०६/२०२१
तलाठी आप्पा म्हटल म्हणजे आजच्या युगातील महसूल विभागातील ब्रम्हदेवच असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण शेतातून विहीर चोरीला जाणे, शेतात विहीर नसली तरी विहीर असल्याचा दाखला देणे, जिरायती जमीनीला बागायती व बागायती जमीनीला जिरायत दाखवणे, परस्पर वारसहक्क काढून टाकणे, परस्पर वारसांची नावे बदलणे,कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतावर दुसऱ्याच्या नावाने पीकपेरे व फेरफार नोंदणी करतांना हेराफेरी करणे, चतूरसिमा लिहितांना चतूरपणा करणे, झाडे कापण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून हिरवीगार झाडे सुकली असल्याचा दाखला देणे, नैसर्गिक आपत्कालीन पंचनामे करतांना नैतिकता न जपणे असे एक ना अनेक गैरप्रकार (सगळेच नाही) काही भ्रष्ट तलाठी करत असतात.हे प्रकार घडल्यानंतर मात्र ते दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना पायपीट करत पदरमोड करावी लागते वेळप्रसंगी वर्षानुवर्षे न्यायालयात झगडत बसावे लागते.
(असाच एक अनुभव लोहारा येथील शेतकऱ्याला आला असून तो शेतकरी जीवंत असल्यावरही तलाठी आप्पांनी त्याला मयत दाखवल्यामुळे त्याला स्वताला जीवंत करुन घेण्यासाठी विविध कार्यालयात भुतासारखे फिरावे लागत आहे.)
(लोहारा येथील माणूसकी ग्रुपचे मा.श्री. गजानन शिरसागर)
लोहारा येथील तलाठी शेख यांचा भोंगळ कारभार उघड झाला असून लोहारा येथील जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवल्यानने त्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने पासून रहावे लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील शेतकरी अशोक भगवान चौधरी यांची लोहारा शिवारात गट नंबर ९२३ क्षेत्र ०,३२ आर शेत जमिन आहे. अशोक भगवान चौधरी यांनी शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत लाभ मिळावा म्हणून रितसर ऑनलाइन फार्म दिनांक २०/०२/२०१९ रोजी फार्म भरलेला होता. त्यानंतर त्यांना ०३/०९/२०२० पहिला हप्ता रक्कम रुपये २०००/०० मिळाले नंतर पुढील एकही हप्ता मला मिळाला नाही.
इतर शेतकऱ्यांना नियमित लाभ मिळत आहे व मलाच लाभ का मिळत नाही. हे जाणून घेण्यासाठी अशोक चौधरी यांनी तलाठी कार्यालयात जाऊन तलाठी नदीम शेख यांना विचारणा केली असता तुमचे पैसे आज येईल उद्या येईल असे सांगून वेळ मारून नेत होते. व व्यवस्थित न बोलता त्या शेतकऱ्याला तेथून हाकलून लावत असे अशोक चौधरींचे म्हणणे असून असेच काही दिवस गेल्यानंतर अशोक चौधरी यांना शंका आल्याने त्यांनी दिनांक २०/०५/२०२१ रोजी ऑनलाईन माहिती काढली ते मयत असल्याचे आढळून आले.
हा प्रकार काय आहे हे विचारण्यासाठी अशोक चौधरी लोहारा येथील तलाठी नदीम शेख यांच्याकडे दिनांक २०/०५/२०२१ रोजी त्यांच्याकडे आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन गेले व ऑनलाइन मला मयत असल्याचे का दाखवले अशी विचारणा केली असता नदीम शेख यांनी व्यवस्थित उत्तरे न तुम्ही मला एक हजार रुपय दिले होते का मग आता पैसे द्या तुमचे काम लगेच मी करून देतो पैसे नसतील तर येथून चालता हो नाहीतर तहसीलदार साहेबांकडे जा तेथे तुला पैसे भेटतील असे म्हणत मला कार्यालयाबाहेर काढले अशी तक्रार अशोक चौधरींनी यांनी केली आहे.
तसेच वरील प्रकारामुळे मी पूर्णपणे भयभीत झालेले अशोक चौधरी यांनी तहसीलदार साहेब पाचोरा यांच्याकडे दिनांक २६/०५/२०२१ व मा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दिनांक २८/०५/२०२१ रोजी लेखी तक्रार अर्ज दिलेला आहे. मात्र आज पर्यंत त्यांच्या अर्जाची दखल घेत कोणत्याही प्रकारे कार्यवाही झालेली नसल्याने त्यांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेता येत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे तलाठी नदीम शेख यांच्याबद्दल बऱ्यापैकी तक्रारी असून कळमसरा येथील संतोष बोखारे हे जिवंत असूनही मयत दाखवल्याचे उघड झाले आहे. तसेच नदीम शेख यांच्या गलथान कारभार व अरेरावीला कंटाळून बऱ्याच शेतकऱ्यांनी यांच्या विरोधात माननीय जिल्हाधिकारी जळगाव व माननीय तहसीलदार साहेब पाचोरा यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. परंतु त्या तक्रारींची अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने तक्रारदार शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर चौकशी होऊन न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
आमरण उपोषणाचा इशारा
माझा पहिला पी एम किसान योजनेचा लाभ मिळाला परंतु नंतर अचानक माझा याजनेचा लाभ बंद करण्यात आला असता.मी तलाठी कार्यालयात विचारपूस करण्यासाठी गेलो असता मला अरेरावीची भाषा, व मारण्याची धमकी देण्यात आली, तुला इंग्रजी वाचता येते का,चल जा बाहेर,पागल आहे तू, व मला मी जिवंत असताना मयत दाखविले आहे असे गैर वर्तन त्यांनी माझ्याशी केले.मी तहसील व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले आहे त्याचे अजून पर्यंत उत्तर मिळाले नाही तरी मला लवकरात लवकर न्याय देण्यात येऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.अन्यथा मला न्याय न मिळाल्यास मी पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा अशोक चौधरी यांनी दिला आहे.
————————————
नजरचुकीने हा प्रकार घडला असून ही चुक लक्षात येताच यात दुरुस्ती करण्यासाठी कागदपत्रे तयार करण्यात आली असून अशोक चौधरी यांची समस्या लवकरच दुर होईल अशी माहिती तलाठी नदीम शेख यांनी दिली आहे.