सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›आता रडायचे नाही…तर लढायचे! पालकमंत्र्यांनी दिला महिलांना धीर,राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंतर्गत २१ लाभार्थ्यांना मदत प्रदान.

आता रडायचे नाही…तर लढायचे! पालकमंत्र्यांनी दिला महिलांना धीर,राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंतर्गत २१ लाभार्थ्यांना मदत प्रदान.

By Satyajeet News
June 15, 2021
570
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२१

(धरणगाव) आपल्यावर आपत्ती आली असली तरी आता न रडता परिस्थितीशी लढायचे…आपल्या सोबत राज्य शासन ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंतर्गत धरणगाव तालुक्यातील २१ महिला लाभार्थ्यांना मदत प्रदान करतांना बोलत होते.*

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १ महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत धरणगाव तालुक्यातील २० महिलांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण ४ लाख मंजूर प्रस्तावाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी प्रास्ताविकात योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विषद केली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील २० महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत ४ लाखांचे तर एका आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या महिला वारसाला १ लाखाच्या मदतीचे धनादेश व पिठाची गिरणी प्रदान करण्यात आली. सर्व २१ गरजू महिलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १ महिन्याचा किराणा व साडी व पातळ देण्यात आले.

याप्रसंगी आशाबाई महाजन (आनोरा), आशाबाई शिरसाठ (पथराड बु ), सुरेखा काळे. (एकलग्न बु), सरला पाटील, वैशाली शिरसाठ , वंदना चौधरी, कविता पाटील, तरन्नुम शेख सलीम, अक्काबाई पारधी, रामवती मोरावकर (सर्व धरणगांव) , सुनिता संतोष पाटील, छाया भोई (चांदसर बु), उषाबाई सोनवणे, सुशिलामाळी (साळवा ), ज्योती पाथरवट (भामर्डी), विमलबाई भिल (वराड बु ), रोहनाबी पठाण (बोरगांव खु), मिना सुतार (बोरगांव खु), रत्नाबाई चौधरी (धरणगांव), सुरेखाबाई शिरसाठ (धानोरा ) या महिलांना शासकीय मदतीचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, सध्याची स्थिती ही अतिशय बिकट अशी असून अनेक कुटुंबांना खडतर स्थितीला सामोरे जावे लागत आहे. मात्र आपल्याला आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून पुढे जायचे आहे. यासाठी राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेतून शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सभापती प्रेमराज पाटील, उपसभापती प्रेमराज पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, धानोरा सरपंच भगवान महाजन, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार एल एन सातपुते , प्रथमेश मोहोळ, न.पा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन, मोहन महाजन, उपसरपंच विलास पवार, महिला आघाडीच्या जना अक्का पाटील, मोहन महाजन, विनोद रोकडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी प्रास्ताविकात सदर योजनेबाबत माहिती सादर केली.सूत्रसंचालन व आभार नायब तहसीलदार एल. एन. सातपुते यांनी मानले, त्यांना सहकार्य नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, गायधनी, भट यांनी केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 182
Previous Article

जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकाऱ्याला १० हजारांची ...

Next Article

सुमित पंडित यांचा वाढदिवस व जागतिक रक्तदान ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    November 12, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगावराजकीय

    पाचोरा उद्या रविवार रोजी “अटल भारतीय जनता पार्टी कार्यालयाचे उद्घाटन सोहळा

    November 14, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    नगराध्यक्ष संजय गोहिल यांना पितृशोक.

    March 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मीना समाज महासभा महिला जिल्हाध्यक्षपदी निशाताई महेर यांची बिनविरोध निवड.

    June 18, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    *संदीप भावराव खरे यांचे निधन*

    April 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सावखेडा बुद्रुक सरपंचपदी श्रीमती सुमनताई वाघ ,व उपसरपंचपदी श्री. राजेश सोनवणे.

    March 1, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    पाचोरा येथे संत हरदेवसिहजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर.

  • Uncategorizedराजकीय

    अद्ययावत रुग्णवाहिका पाचोरा – भडगाव तालुका वासीयांसाठी हजर – मा. आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न.

  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड येथे मापात पाप करणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांना गावकऱ्यांनी दिली तंबी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज