सुमित पंडित यांचा वाढदिवस व जागतिक रक्तदान दिनानिमित्त केले २१ दात्यानीं रक्तदान,सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२१
जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे पाचोरा येथील संभाजी महाराज चौकात भव्य रक्तदान शिबिर व ११ कोरोना योध्दे व सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल,श्रीफळ, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या सुरवातीला कार्यक्रमाचे उद्दघाटक म्हणून लाभलेले भरत काकडे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा, डॉक्टर सागर दादा गरुड, डॉक्टर यांनी गाडगेमहाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन करत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या रक्तदान शिबिरात सुमित पंडित गजानन क्षीरसागर, सचिन पाटील, गुलफाम शेख, रवींद्र सुतार, आत्माराम भगत, विजय कोळी, एम आर दादा, चव्हाण दादा, सोमनाथ स्वभावाने,आदींनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे यांनी जागतिक रक्तदानाविषयी जनजागृती करून लोकांना रक्तदान करण्याचे आव्हान केले.११ कोरोना योध्याचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात साजरा करन्यात आला यामध्ये लॉकडाऊच्या कालावधीत ज्यांनी एक पाऊल पुढे टाकत गोरगरिबांना मदत केली अश्या डाँक्टर,पोलीस,सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला होता.
मा.श्री.भरत काकडे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा, डॉक्टर सागर दादा गरुड, डॉक्टर अकील शेख, डॉक्टर वैभव सूर्यवंशी डॉक्टर मोहनराव शिंपी, गुलफाम शेख,अमोल पाटील, कमलेश पाटकरी यांना कोरोना योद्धा सन्मान देऊन गौरवण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणुसकी रुग्णसेवा समूह व्हाट्सअप ग्रुप सदस्यांनी सहकार्य केले त्यामध्ये समाजसेवक सुमित पंडित, कमलेश पाटरी, अमोल पाटील, कवी मंगलदास मोरे, देविदास साबळे, रवींद्र देवरे, सचिन पाटील, चेतन पाटील, विलास जाधव, अमोल शेलार दीपक पाटील, रक्त संकलनासाठी विघ्नहर्ता ब्लड स्टोरेज यांचा समावेश होता.