शिंदे अँकेडमी आणि डॉ. भुषणदादा मगर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, केंद्र सरकार श्रमिक लेबर कार्ड योजना भव्य मेळावा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०८/२०२१
पाचोरा येथे शिंदे अँकेडमी आणि डॉ. भुषणदादा मगर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकार श्रमिक लेबर कार्ड योजनेचा भव्य मेळावा दि ७ सप्टेबर २०२१ मंगळवार रोजी सकाळी १०-३० वाजता भडगाव रोड महालपुरे मंगल कार्यालय येथे आयोजीत करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेशदादा पाटील, प्रमुख अतिथी अमोलभाऊ शिंदे, डॉ. भुषणदादा मगर उपस्थीत राहणार असुन या मेळाव्यास मुख्य मार्गदर्शन सी.एस.सी. जिल्हा समन्वयक गजानन पाटील करणार आहेत.
सदर मेळाव्यास महिला- पुरुष शेतमजुर, हातमजुर, घरकाम करणारे अशा विविध क्षेत्रात रोजदारी, साप्ताहीक, मासीक पगार तत्वावर काम करणारे १५६ व्यवसाईक, मजुर यांचा श्रमिक लेबर कार्ड योजनेत लाभार्थी म्हणुन समावेश करण्यात आला आहे. तरी या सर्व श्रमिक वर्गातील महिला- पुरुषांनी अधिक माहितीसाठी मेळाव्यास उपस्थिती द्यावी असे आवाहन प्रकल्प प्रमुख संदीप महाजनसर यांनी केले आहे