अंबे वडगाव येथील श्री. पारिमांडल्य महानुभाव आश्रमात सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी अवतारात दिन महोत्सवाचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०९/२०२३
आपणास सहर्ष सूचित करण्यात येते की, परमेश्वराच्या असिम कृपाप्रसादाने, कै. प. पू. प. म. महाराष्ट्राधिकरण गुरुवर्य आचार्य प्रवर श्रीयेळमकर मोठे बाबाजी यांच्या प्रसन्नतेने तथा जळगाव जिल्हा महानुभाव परिषद यांच्या विद्यमाने सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दीन महोत्सव भाद्रपद शुध्द द्वितीया शनिवार दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न होत आहे. ततप्रसंगी पंथातील जेष्ठ श्रेष्ठ आचार्यगणसंत महंत वासनिक मंडळी यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व सद्धभक्त वासनिक मंडळी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून
ज्ञानश्रवणाचा तथा धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि संत महंत आपली शुभचिंतनार्थ उपस्थिती प्रार्थनिय आहे.
या सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०७ वाजता श्री. येळमकर पिढी कुलवंदनास मंगलस्नान, सकाळी ०८ वाजता श्रीमद्भगवद्गीता पाठ पारायण, ११ वाजता पंचावतार उपहार महोत्सव, दुपारी ०४ वाजता पालखी सोहळा व शोभायात्रा, सायंकाळी ०७ वाजता भेटकाळ सोहळा सायंकाळी ८ वाजता चर्चासत्र व धर्मसभा शनिवार दिनांक १६ सप्टेंबर २०२३ शनिवार रोजी सकाळी ७ वाजता श्रीमदभगवदगीता पाठ पारायण सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण सकाळी ९.०० वाजता धर्मसभा, अनुसरण विधी सकाळी ११.०० वाजता अध्यक्षीय भाषण सकाळी ११.३० वाजता स्मरण चिंतन, महाअवसर दुपारी १२.०० वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महंत श्रीयेळमकर महानुभाव (अध्यक्ष जळगाव जिल्हा महानुभाव परिषद्), श्रीयेळमकर प्रतिष्ठेच्या सर्व शिष्यगाद्या श्रीपारिमांडल्य महानुभाव आश्रमस्त संत महंत वासनिक परिवार, आचार्य श्रीप्रभाकर अशनाख्य पाठशाळा, श्री. पारिमांडल्य महानुभाव आश्रम, अंबे वडगाव गुरूकुल आयोजक जळगाव जिल्हा महानुभाव परिषद्, समस्त अंबे वडगाव ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील सद्भक्त वासनिक मंडळ यांनी केले आहे.