लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा , खासदार उन्मेश दादा पाटील यांचे भडगाव येथे आवाहन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०३/२०२१
—————————————
खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत भडगाव येथे लसीकरणास सुरुवात.
———————————–
भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आज खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरीक प्रकाश भोसले , अभयकुमार भंडारी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. भडगाव शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे दुपारी तीन वाजता ही लस देण्यात आली. यावेळी भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भाजपचे भडगाव तालुका अध्यक्ष अमोल नाना पाटील , ग्रामीण रूग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज जाधव ,चंद्रकांत भोसले (आमडदेकर), विशाल पाटील, सिंद्धांत पाटील तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील म्हणाले *या लस निर्मितीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या देशाच्या सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक आभार मानतो.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या माध्यमातुन शेवटच्या घटकाला लस मिळवुन देण्याचा निर्धार व्यक्त केला असून सर्वांनी लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा. असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी केले.