वडाळी दिगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुरेश शिनगारे तर उपाध्यक्ष पदी भागवत घोरपडे यांची निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२१
जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी दिगर येथे नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीची कोविड-१९ चे नियम पाळून सभा घेण्यात आली. या सभेत शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठीत करण्यात आले. यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्यांची शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमधून निवड करण्यात आली. यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुरेश प्रकाश शिनगारे तर उपाध्यक्षपदी भागवत सुरेश घोरपडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पदी ज्योती संतोष बनसोडे,कीर्ती ज्ञानेश्वर गोसावी,परिशान इन्सान तडवी,ज्योती ज्ञानेश्वर उबाळे,सुवर्णा चंद्रकांत खेंते,ज्योती गजानन बजारे,ईदबार अब्दुल तडवी,श्रावण उखा भालेराव,प्रकाश नामदेव गोसावी,गुलाब गंभीर तडवी,शिक्षणप्रेमी सदस्य चित्रा संदिप सावळे,शिक्षक सदस्य निलेश अशोक भामरे,विद्यार्थी सदस्य आरती भानुदास रोहम,गणेश विनोद भालेराव आदींची निवड करण्यात आली.निवड झालेले अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविकात मुख्याध्यापक योगेश काळे यांनी शाळा व्यवस्थापन समिती रचना,कार्य व जबाबदारी तसेच शासन निर्णय याविषयी सविस्तर माहिती दिली.सुत्रसंचलन उपशिक्षक संदिप पाटील यांनी केले.आभार उपशिक्षक निलेश भामरे यांनी मानले.प्रशासकीय कामकाज मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी पार पाडले.संपूर्ण प्रक्रियेस गावकरी व पालकांचे कोविड-१९ चे नियम पाळत सहकार्य लाभले.