सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • शेंदुर्णी येथील संशयास्पद व्यवहारावरुन दि पाचोरा पीपल्स बॅंक निवडणुकीत सहकार पॅनल अडचणीत.

  • कुऱ्हाड खुर्द येथील हॉटेल तारांगणाचा धिंगाणा थांबला, परंतु हॉटेल मैत्रीचे काय ?

  • पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव.

  • वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणीने भावाला दिली गाय भेट.

  • लोहारी बुद्रुक सरपंच व सरपंच पती यांच्या विरोधात महिला उपसरपंचांची तक्रार, चौकशी करुन कारवाईची केली मागणी.

राजकीय
Home›राजकीय›“शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी “. सगळीकडे गाजत आहे तालाठोक, हल्लाबोल आंदोलन, मात्र अद्यापही राणे कुटुंबीयाचे कुणीही केले नाही सात्वन.

“शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी “. सगळीकडे गाजत आहे तालाठोक, हल्लाबोल आंदोलन, मात्र अद्यापही राणे कुटुंबीयाचे कुणीही केले नाही सात्वन.

By Satyajeet News
June 13, 2021
932
0
Share:
Post Views: 258
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०६/२०२१

शेळी जाते जीवानिशी आणि खाणार म्हणतो वातट कशी
एखाद्या मनुष्याने खूप जीव तोडून एखादी गोष्ट दुसऱ्याला संतोष देण्याकरितां करावी पण त्याबद्दल त काहीच वाटूं नये, अशा स्थितीत ही म्हण वापरतात.

अशीच परिस्थिती एक कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिचित असलेले विद्यूत वितरण कंपनीचे कर्मचारी जे आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्नात असलेले व आज आपल्यातून अकस्मात निघून गेलेले स्व.गजानन राणे यांच्या बाबतीत अनुभवायला येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दिनांक ०७ जून सोमवारी पाचोरा व भडगाव तालुक्यात तालाठोक-हल्लाबोल आंदोलन केले त्यावेळी भडगाव येथील महावितरण कार्यालयात काही संशयित राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडफोड करत अभियंता श्री.अजय धामोरे यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यात स्व.गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

परंतु घटना घडून सात दिवस झाले या सात दिवसात सत्ताधारी आंदोलन कर्ते व विरोधीपक्ष यांच्यात कलगीतुरा सुरु असून स्व.गजानन राणे यांच्या मारेकऱ्यांना शोधून कठोर शासन व्हावे म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे अमोलभाऊ शिंदे यांनी आजच पत्रकार परिषदेत काही संशयित आरोपी पकडले आहेत मात्र या मागचा कर्ता,करविता धनी दुसराच असून त्याचा शोध घेऊन कडक शासन व्हावे अशी मागणी केली आहे.

एका बाजूला ह्या घटना घडत असतांनाच दुसरीकडे दुसऱ्याचे घर सतत प्रकाशमान रहावे म्हणून झटणारे मनमिळाऊ स्वभावाचे असलेले कर्तव्यदक्ष कर्मचारी स्व.गजानन राणे यांच्या घरात मात्र कायमस्वरूपी अंधार झाला आहे.

राणे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असल्यावरही फक्त आणि फक्त ऊर्जामंत्र्यांनी दुरध्वनीच्या माध्यमातून राणे कुटुंबियांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन सात्वन करत मानसिक आधार दिला आहे.

परंतु आज बातमी लिहिली तो पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार घटना घडल्यापासून पाचोरा व भडगाव तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सत्ताधारी आमदार, माजी आमदार, विरोधीपक्ष नेते कार्यकर्ते यांच्यापैकी एकही पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी राणे कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहचून माणूसकी दाखवली नसल्याने भडगाव, पाचोरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून राजकीय पदाधिकाऱ्यांबद्दल संतप्त प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली जात असून राणे कुटुंबियांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे..

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

भडगाव ते पाचोरा दरम्यान अपघातात दोन ठार ...

Next Article

ना.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदूर्णी येथे युवासेनेच्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    तरुणाईला आ. किशोर अप्पा पाटील यांचे आकर्षण कायम, कजगाव, भोरटेक येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

    June 24, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    जळगाव लोकसभा मतदारसंघात मतदारांचा एकच वादा, निवडून आणू करण दादा.

    April 24, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    हि अधिवेशनं

    December 31, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    चाळीसगाव येथे भाजपा खासदाराच्या कार्यालया समोर कॉंग्रेस चे आंदोलन.

    February 18, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    सावखेडा खुर्द विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत महा विकास आघाडीच्या सहकार पॅनलचा दणदणीत विजय.

    June 5, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    भाजपाचे अमोल शिंदे यांच्या पत्राची निवडणुक आयोगाने घेतली दखल, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत उमेदवारांना जात पडताळणी चे टोकन/पोहच जोडण्याची मुभा.

    December 6, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • विविध यश निवड

    राष्ट्रीय हिंदी निबंध स्पर्धेत कु. चेतना हिरे यांच्या “उठो द्रोपदी शस्त्र उठा लो” या कवितेला प्रथम क्रमांक.

  • शैक्षणिक

    कर्तृत्वाने उजाळलेल यशाचे सोनं, डॉ. कादंबरीचा अभिमानास्पद प्रवास.

  • क्राईम जगत

    गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या शिंदाड गावाला दंगलीचे ग्रहण, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज