जामनेर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०७/२०२१
जामनेर तालुक्यात शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जामनेर तालुक्यातील गावागावात जाऊन जनतेला शिवसेनेचे तत्व सांगत गावागावातील समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, तसेच गावातील तरुणांसाठी वाचनालय, व्यायाम शाळा व व्यसनमुक्ती कडे वाटचाल या विषयावर चर्चा करून गावागावात शिवसंपर्क अभियानाअंतर्गत सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.
या शिवसंपर्क सदस्य नोंदणी अभियानासाठी शिवसेना शहरप्रमुख पवन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानला जोरदार सुरवात करण्यात आली असून वाघारी, सामोरद, बेटावद खुर्द, मोठी बेटावद, वाडीकिल्ला, शंकरपुरा, रामपूर, लहासर, नागन खुर्द, देवळस गाव, मोय खेडा वाडगाव, सार गाव, पाटखेडा, सोनारी, मालदाभांडी, वाडी सह इतर गावात जाऊन शिवसंपर्क अभियानाअंतर्गत सदस्य नोंदणी करण्यात येत आहे.
त्या अभियानासाठी कट्टर शिवसैनिक सुमित चव्हाण, तालुका संघटक विष्णू भाऊ सोनवणे, शेंदूर्णी शहरप्रमुख विलास भाऊ पाटील, कट्टर शिवसैनिक पत्रकार काशिनाथ शिंद, विश्वास पाटील, शिवसैनिक सईद. शेख. इमरान शेख. शेख अजहर हे अथक परिश्रम घेत आहेत.