ना.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदूर्णी येथे युवासेनेच्या वतीने फळे वाटप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०६/२०२१
पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा युवासेना प्रमुख युवाहृदयसम्राट ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त शेंदूर्णी येथील युवासेनेच्या वतीने युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख मा.श्री. विश्वजितराजे पाटील यांच्या हस्ते शेंदूर्णी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळांचे वाटप तसेच शेंदूर्णी गावातील गरजू, निराधारांना शिवभोजना सोबत मिष्टान्न व फळांसह फुड पाकिटांचे वाटप करण्यात आले.
तसेच जामनेर तालुका उपप्रमुख मा.श्री. डॉ. सुनील अग्रवाल यांच्या कडून शिवभोजन सोबत मोतीचुरचे लाडू व अजय भाऊ भोई युवासेना शहर अधिकारी यांच्या कडून केळी वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जय सेवालाल मेडिकल चे संचालक मा,श्री राहुल भाऊ राठोड व निखिल भाऊ राठोड
युवा तालुका प्रमुख विशालभाऊ लामखेडे,शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठभाऊ पाटील,युवा तालुका प्रसिद्धीप्रमुख मुकेशभाऊ जाधव,शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्यासाहेब गुजर,शेंदुर्णी युवा शहर प्रमुख अजयभाऊ भोई,शहर संघटक सिद्धुभाऊ पाटील,मा,श्री सुनील दादा गुजर गुणवंत चौधरी,
प्रवीण चौधरी, अशोक बारी,भुषणभाऊ बडगुजर,गणेशभाऊ कोळीमेणगाव,आनंदाभाऊ कोळी मेणगाव,चंद्रकांतभाऊ पाटील तळेगाव, सोनुभाई गोरे,योगेशभाऊ वंजारी व शिवसैनिक उपस्थित होते.