पाचोरा येथे आज मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना साहित्य वाटप, उपस्थितीचे आवाहन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०१/२०२४
जनसेवा हीच ईश्वर सेवा हा मंत्र हाती घेत पाचोरा, भडगावचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी विविध उपक्रम राबवून शासकीय योजना गोरगरिबांच्या पदरात कशा प्रकारे टाकल्या जातील याकरिता ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांनी भडगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना नुकतेच १० लक्ष रुपये किंमतीचे साहित्य वाटप केले आहे. व आता आज दिनांक ११ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मोंढाळा रस्त्यावर असलेल्या तुळजाई जिनिंग येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे ३० लक्ष रुपये किंमतीच्या २५ प्रकारच्या विविध साहित्याचे वाटप मा. जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत ५०० लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. तरी या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात तपासणी झालेल्या सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे.
सदर दिव्यांगांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती, जिल्हा रुग्णालय व रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांचा सहभाग असून या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मा. श्री. आयुष प्रसाद यांच्यासह आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रामसिंग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी भुषणजी अहिरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रमुख एस. पी. गणेशकर, यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
तरी पाचोरा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहून विविध प्रकारच्या साहित्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या वतीने तालुकाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख किशोर बारावरकर, बंडू चौधरी यांनी केले आहे.