यशवंत गड येथे शिवप्रेमींच्या वतीने संवर्धन मोहीम

वेंगुर्ले

रेडी येथील यशवंत गड येथे शिवप्रेमींच्या वतीने संवर्धन मोहीम राबवण्यात आली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सातारा येथील शिवप्रेमी सहभागी झाले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा रेडी गावातील यशवंत गड गेली कित्येक वर्षे स्थानिक शिवप्रेमी संवर्धन करत आहे. दोन दिवस ही मोठी संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली होती.

यामध्ये सातारा येथील ऐतिहासिक भटकंती शिवप्रेमी, रेडी शिवप्रेमी, सह्याद्री दुर्गसेवक शिवप्रेमी आणि सिंधुदुर्ग शिवप्रेमी आणि जिल्ह्यातील शिवप्रेमी संघटनेने सहभाग घेतला होता. तसेच शिवप्रेमीनी संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हावासीयांना आव्हान करण्यात आले की श्री छत्रपती शिवाजी महाराज जरी आज आपल्यात नसले तरीही ते आज गड किल्ल्याच्या स्वरूपात जिवंत आहे ह्या गड किल्ल्यावर किती तरी मावळ्यांनी आपले रक्त सांडले आपल्याला सुंदर असे स्वराज्य मिळावे त्यासाठी त्यामुळे त्या गड किल्ल्यांचे संवर्धन करा जेणेकरून पुढील पिढीला आपला इतिहास कळेल.

ब्रेकिंग बातम्या