सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›झोपेचे सोंग घेतलेल्या पाचोरा नगरपालिका प्रशासनाने आदर्श घ्यावा असा- आर्यन ग्रुपच्या तरुणांचा अभिनव उपक्रम.

झोपेचे सोंग घेतलेल्या पाचोरा नगरपालिका प्रशासनाने आदर्श घ्यावा असा- आर्यन ग्रुपच्या तरुणांचा अभिनव उपक्रम.

By Satyajeet News
June 5, 2021
254
0
Share:
Post Views: 68
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०६/२०२१

मान्सूनची पूर्व तयारी म्हणुन नगरपालिकेकडून शहरात नालेसफाईसह सर्व शहरात साफसफाई व इतर तयारी होणे अपेक्षित होते.परंतु शहरात तसे कुठेच दिसुन येत नाही.परंतु समाजाशी आपली एक बांधीलकी ठेवत पाचोरा शहरातील तमान सामाजिक सेवा करणार्‍या तरूणांचा ग्रुप आर्यन युवा फाउंडेशन तर्फे शहरातील एकमेव हिंदु स्मशानभुमित या कोरोना महामारिच्या काळात जे घाणीचे साम्राज्य पसरले होते ते आर्यन ग्रुपच्या तरुणांनी स्वच्छता मोहिम राबवून स्वच्छ करून समाजासमोर नवीन आदर्श उभा केला आहे.

स्मशानभूमीतील व परिसरातील या घाणीच्या साम्राज्यामुळे या परिसरात दुर्गंधी वाढली होती.लवकरच मान्सूनचे आगमन होणार असुन येणार्‍या काळात पावसामुळे त्या भागातिल घाण उचलणे व स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे असतांना नगरपालिकेने या विषयाकडे दुर्लक्ष केलेले दिसत होते जर या परिसराची वेळेवर स्वच्छता झाली नसती तर घाणीच्या साम्राज्यामुळे अनेक अडचणी उभ्या राहू शकल्या असत्या तसेच त्या घाणीमुळे साथीचे आजार व परिसरातिल तसेच शहरातिल नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होउ शकला असता ही बाब लक्ष्यात घेऊन आर्यन युवा फाउंडेशन तर्फे २४/०५/२०२१ रोजी पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मा.शोभा बाविस्कर यांना निवेदन देउन ही व्यथा मांडली होती.

ही बाब ऐकून घेत त्यांनी दोन दिवसात ही समस्या सोडवू असे आश्वाशितही केले होते. पण आज १२ दिवस होउनही नगरपालिका प्रशासनाने या विषयाचे गांभिर्य लक्षात घेउन कोणतिही उपाययोजना केली नाही.या १२ दिवसाच्या कालावधित आम्हि मा.मुख्याधिकारी यांचेशी सतत संपर्क साधला पण त्यांनी फक्त अश्वासन दिले.प्रत्यक्षात कोणतीही कृती झाली नाही.नगरपालिकेने पाचोरा शहरातिल स्वच्छतेचा ठेका ज्यांना दिला आहे. त्यांच्याशीही ह्या तरुणांनी संपर्क साधला माञ त्यांनीही वेळ काढुपणा केला.या अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानी कारभारा विरूध्द आजच मा.जिल्हाधिकारी साहेब व वरिष्ठ अधिकारी,लोकप्रतिनीधी यांना तक्रारी करण्यासाठी आर्यन युवा फाउंडेशन चे पदाधिकारी सज्ज झाले असले तरी शहराचे सुज्ञ नागरिक म्हणुन राष्टपिता महात्मा गांधी यांच्या गांधिगीरी मार्गाने आर्यन युवा फाउंडेनशचे पदाधिरकाऱ्यांनी आज दि.०५/०६/२०२१ शनिवार रोजी शहरातिल एकमेव हिंदु स्मशानभुमितील व परिसरातील घाणीची स्वच्छता करून एक अभिनव उपक्रम राबविला आहे.

ही गांधीगीरी केल्यावरही पाचोरा नगरपालिका प्रशासन जे झोपेचे सोंग घेउन झोपी गेले आहे. ते जागे झाले नाही तर पुढिल वेळेस हा कचरा सबंधित अधिकारी यांचे दालनात व नगरपालिका प्रशासकिय इमारतीच्या आवारात नेऊन टाकण्याचे धाडसही आर्यन युवा फाउंडेशनतर्फे करण्यात येईल.असे या तरुणांकडून सांगण्यात आले.तरी आजच्या या आर्यन युवा फाउंडेशनच्या या गांधीगीरी उपक्रमात सहभागी होउन.स्वच्छ व सुरक्षित शहर या मोहीमेत अध्यक्ष आर्यन मोरे ,उपाध्यक्ष भूषण पाटील, सचीव आनंद शिंदे,अशोक मोरे, मोहीत देवरे, दिपक सोनवणे सोयगाव तालूका अध्यक्ष भूषण पाटील,वरखेडी अध्यक्ष निशांत वणारसे ,सारोळा अध्यक्ष दिपक पाटील ऋषीकेश कोळी,शूभम पाटील, सोहिल तलवार, हेमंत भोई, मनोज भोई, देवेंद्र देवरे,निलेश पाटिल,तेजस देवरे, बबलू अंभोरे, किरण पाटिल, (नानू) राहूल पाटील,ललीत पाटिल,रोहित सूतार,अनिकेत चौधरी, शारूख शाह, पवन शिंदे, रोहिदास गायकवाड,सोमनाथ पाटिल, मयूर बारी, अवीनाश शिंदे,गोपाल भडांगे,कौशल निकम,यांनी सहभागी होऊन जे नगरपालिका प्रशासनाचे करावयास हवे ते काम करून दाखवल्याने आता तरी नगरपालिका झोपेतून जागे होऊन मान्सून पूर्व तयारीस लागून लोकांच्या जीवाशी खेळणे थांबवले का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा शहरात लवकरच सौर दिव्यांचा लखलखाट, पाचोर ...

Next Article

घरी आलेल्या बाळाला पाहताच, अश्रूंची झाली फुले. ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील सार्वे(पिंप्री) गाव बनले समस्यांचे माहेरघर

    November 29, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कोल्हे गावातून शौचालयांची चोरी, हागणदारी मुक्त गाव योजनेचा बोजवारा.

    August 18, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मालखेडा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात नीलगाय ठार, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.

    September 4, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    दोन सजेवर तलाठी एक, गावे अकरा,अत्यावश्यक कागदपत्रांसाठी शेतकरी मारतोय चकरा.

    December 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सण, उत्सवाचे पार्श्वभूमीवर शेंदूर्णी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न.

    April 7, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पारोळा माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कडे खासदार उन्मेश दादा यांची द्वार दर्शन भेट.

    May 24, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवार सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांना वाढता पाठिंबा.

  • ब्रेकिंग न्यूज

    वरखेडी येथील विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी ? पोलीसांच्या भुमिकेकडे जनतेचे लक्ष.

  • क्राईम जगत

    पाचोरा नगरसेवकांसह तिघांवर गुन्हा दाखल.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज