वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र जवळ सोशल डिस्टंसिंग चा फज्जा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र जवळ बँकेच्या ग्राहकांनी मुख्य दरवाजाजवळ एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सर्वदूर कोरना सारख्या महाभयंकर आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून यासाठी शासन प्रशासन व स्थानिक संस्था सामाजिक अंतर राहावे म्हणून सोशल डिस्टंसिंग अमलात आणण्यासाठी जनता कर्फ्यूचा अवलंब करत आहे. वरखेडी येथे मागील आठवड्यात तीन दिवस जनता कर्फ्यू करण्यात आला होता. व आताही उद्या आठवडे बाजार निमित्त जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
मात्र दुसरीकडे बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक यांना या कोरोना महामारी विषयाचे गांभीर्य लक्षात आले नसल्याचे जाणवते कारण बँक ऑफ महाराष्ट्र जवळ सकाळी ११ वाजेपासून बँक खातेदार त्यांचा दैनंदिन व्यवहार करण्यासाठी येतात व एकच झुंबड पडते.
तसेच कोरोनाचे कारण पुढे करत स्वतःच्या सुरक्षेसाठी बँक व्यवस्थापक यांनी बँकेत खाते धारकांचा प्रवेश नाकारला असल्याचे दिसून येत असल्याने पैसे काढणे किंवा पैसे टाकण्यासाठी बँक ग्राहक बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकच गर्दी करतात. या कारणास्तव या बँकेच्या व्यवहारासाठी अनेक गावातून आलेले बँकेचे ग्राहक एकत्र येत असल्याने तसेच पुढील आठवड्यात बँकांना सतत सुट्टी असल्याने बँकांची ग्राहकांची एकच झुंबड उडत आहे.
तरी बँकेच्या व्यवस्थापकांनी भर उन्हात उभ्या राहणाऱ्या बँक ग्राहकांसाठी सावलीची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यास ग्राहक एकच गर्दी करणार नाहीत. मात्र येथे लॉकडाउनचा फज्जा उडत असल्याने सुज्ञ नागरिकांनी बँकेच्या व्यवस्थापकाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.