सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›घरी आलेल्या बाळाला पाहताच, अश्रूंची झाली फुले. पाचोरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

घरी आलेल्या बाळाला पाहताच, अश्रूंची झाली फुले. पाचोरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

By Satyajeet News
June 6, 2021
1267
0
Share:
Post Views: 38
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०६/२०२१

पाचोरा शहरात बाहेरपुरा भागात दिनांक ०५ जून शनिवारी अकरावाजेच्या सुमारास मतिन रज्जाक बागवान यांना एक चार वर्षाचे बालक बेवारस मिळुन आले होते. मतीन बागवान यांनी या बालकाला वीचारपूस केली मात्र ते काहीच बोलत नव्हते व ते अनोळखी वाटल्याने क्षणाचाही विलंब न करता मतीन बागवान यांनी पाचोरा पोलिसांना ही माहिती दिली.

माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.किसनराव नजन पाटील यांनी परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, पोलिस उपनिरीक्षक दत्तातय नलावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस काॅन्स्टेबल किरण पाटील, पोलीस नाईक राहुल बेहरे, किशोर पाटील, महिला पोलिस शारदा भावसार अशा पथकास बालकाचे पालकांचा शोध घेणे कामी तात्काळ रवाना केले.

वरील पथकाने मिळुन आलेल्या बालकास ताब्यात घेवुन पाचोरा शहरात त्याचे पालकांचा शोध घेतला. पोलिस पथकाच्या शोध मोहीमे दरम्यान हरवलेला बालक हा शेख रहीस शेख बशीर रा. पाचोरा ता. पाचोरा जि. जळगाव यांचा मुलगा असल्याचे उघड झाले. सदर मिळुन आलेल्या मुलाचे नाव हस्नान शेख रईस (वय – ४) असे सिद्ध झाल्यावर पाचोरा पोलीसांनी वरील मुलाचे पालकास पाचोरा पोलीस स्टेशन येथे बोलावुन हस्नान शेख रईस यास त्यांचे ताब्यात सुखरुप सोपविले.

ईकडे मुल सापडत नाही म्हणून शोधाशोध करत आपला मुलगा कुठे असेल या विचारांनी आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. परंतु पाचोरा पोलिसांनी आपला मुलगा सुखरूप घरी आणल्याचे पाहून काही तासापूर्वी मुलगा सापडत नसल्याने मुलाच्या आईच्या डोळ्यातून सतत वाहणाऱ्या दुखाच्या अश्रूचे रुपांतर आनंदाश्रूत झाले.

(पाचोरा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वञ कौतुक केले जात आहे.)

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

झोपेचे सोंग घेतलेल्या पाचोरा नगरपालिका प्रशासनाने आदर्श ...

Next Article

जनसेवा न्यास संचलित मोफत पोस्ट कोविड ओपीडीचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    दुःखद निधन ...

    July 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील आठवडी बाजार सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी. व्यापारी व शेतकऱ्यांची मागणी.

    August 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    साला एक मच्छर आदमी को बीमार बना देता है, म्हणून फवारणी करणे गरजेचे.

    September 26, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्याचे तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी मतदान करून तरुणांना केले मतदानासाठी प्रोत्साहित.

    January 15, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जिल्हापरिषद सदस्य मधुकर भाऊ काटे यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कामासाठी ६६ लाखांचा निधी, लवकरच होणार कामाला सुरुवात.

    June 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील वरसाडे प्र.पा.येथील ग्रामपंचायत सदस्य डॉ.नितीन चव्हाण अपात्र.

    August 31, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    भोकरी ग्रामपंचायत ते वरखेडी बसस्थानकापर्यंतच्या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात येऊन रस्ता नुतनीकरण करण्यात यावा वरखेडी ग्रामस्थांची मागणी.

  • Uncategorizedराजकीय

    महिला बालकल्याण समिती नगरपरिषद पाचोरा आयोजित पाचोरा नगरीतील विधवा माता – भगिनी सन्मान सोहळा संपन्न.

  • पाचोरा तालुका.

    रविवारी पाचोऱ्यात लोकशाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही शाहिरी जलसा; उपस्थितीचे आवाहन.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज