परराज्यातील फेरीवाल्यांची खेडेगावातील भटकंती संशयास्पद.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०२/२०२१
उत्तर प्रदेशातील काही तरुण पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात फिरुन अत्तर, घर सजावटीसाठी लागणारी फुले, टेबलक्लॉथ, मसाज करण्यासाठी लागणारे मशीन व इतर वस्तू विकणतांना दिसून येतात मात्र या परप्रांतीय फेरीवाल्यांची भटकंती ही ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत आहे.
कारण से फेरीवाले दुपारी बारा वाजेपासून गावात प्रवेश करतात दुपारी चार वाजेपर्यंत गावातील गल्लीबोळात फिरुन व्यवसाय करतात मात्र याच वेळात ग्रामीण भागात शेतकरीवर्ग रहात असल्याने पुरुष मंडळी शेतात असतात व याच संधीचा फायदा घेत हे व्यवसायीक घरातील महिलांना न विचारत नकार दिला तरी घरात घुसतात व त्यांच्याजवळील वस्तू खरेदी करण्यासाठी हट्ट धरतात व बनावट वस्तू देऊन जास्तीत जास्त पैसे घेऊन लुबाडणूक करतात तसेच जस्त चौकशी केल्यास हुज्जत घालतात असे महिलावर्गातून समजते.
तसेच गावपरिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने या फेरिवाल्यांच्या भटकंती बाबत संशय व्यक्त केला जात आहे. म्हणून या फेरीवाल्यांनी गावात प्रवेश करण्याअगोदर गावातील पोलीस पाटील, सरपंच किंवा गावातील स्थानिक जबाबदार व्यक्तींनी त्यांची चौकशी करुनच गावात प्रवेश द्यावा अशी मागणी होत असून हे फेरीवाले ज्या शहरात मुक्कामाला आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये यांची नोंद होणे गरजेचे आहे.