मा. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत सामिल व्हा सौ. वैशाली ताई सुर्यवंशी याचे जाहीर आवाहन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२२
जाहीर आवाहन
पाचोरा – भडगाव विधानसभा* मतदारसंघाचे माजी आमदार श्रद्धेय तात्यासाहेब ‘आर. ओ. पाटील’ यांच्या विचारांची आणि तत्त्वांची शिकवण आणि शिवसेनेशी असलेली एकनिष्ठता जिल्हाच काय संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे.तात्यासाहेबांनी आपल्या कारकिर्दीत जनसामान्यांची सेवा, तळागाळातील गोर – गरीब जनतेला मायेचा आधार दिला.सामाजिक बांधिलकी जोपासली. पाचोरा भडगाव मतदारसंघातील *विकासाची कामे* मार्गी लावली.याच विचारांची आणि तत्त्वांचे शिदोरी माझ्या पाठिशी आहे आणि समस्त शिवसैनिकांचे मोलाची साथ असताना मी श्रद्धेय तात्यासाहेबांची ‘इच्छापूर्तीसाठी’ राजकारणात प्रवेश केलेला आहे. उद्या दिनांक ९ ऑगस्ट २०२२ (मंगळवार) रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरणमंत्री मा. आदित्य ठाकरे साहेब जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यानिमित्ताने पाचोरा शहरात ‘शिवसंवाद’ यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी १०:०० वा. जळगाव विमानतळावर मा. आदित्य ठाकरे साहेबांचे आगमन होईल व सकाळी ११:३० मिनिटाला पाचाेरा शहरातील ‘शिवतीर्थ’ कार्यालयासमोर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मी पाचोरा तसेच भडगाव तालुक्यातील तमाम जनतेला, शेतकरी बांधवांना, शहरातील उद्योजक, डॉक्टर, व्यापारी बंधू, तरुणवर्ग, महिला भगिनी, कार्यकर्ते, शिवसैनिक यांना आवाहन करते की, आपण मा. आदित्य ठाकरे साहेबांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी ही आग्रहाची विनंती.*
आपलीच,
सौ वैशाली सुर्यवंशी.
अध्यक्षा, निर्मल इंटरनॅशनल स्कूल, (सी.बी.एस.ई.) पाचोरा.
संचालिका, निर्मल सीड्स प्रा. लि.पाचोरा.