महाविकास आघाडी मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती तर्फे आमदार व माजी आमदार यानां निवेदन सादर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०६/२०२१
पाचोरा येथे महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिं तर्फे आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यानां महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या शिक्षण आणि रोजगारा मध्ये मागासलेपणा दुर करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकार ने पारित केलेल्या मेहमूदुर रहमान कमेटी द्वारे सिफारिश केलेल्या १०% आरक्षणाच्या मागणी साठी निवेदन देण्यात आले.
यात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.
१)-मेहमूदुर रहमान कमीटीच्या अहवाला मध्ये मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि रोजगारामध्ये तत्काळ १०% आरक्षण देण्यात यावे.
२)-मुस्लिम समाजातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण व संशोधन संस्था जसे की बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर स्वतंत्र संस्था सुरु करण्यात यावी.
३)-जिल्हा पातळीवर मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणा साठी सुसज्ज वस्तिगृहांची उभारणी करण्यात यावी.
४)-पाचोरा नगर पालिका तर्फे शाळा सुरु करण्यात याव्या.
अश्या प्रकारच्या मागण्या घेवुन मुस्लिम समाजातील राजकीय, सामाजिक लोकांच्या शिष्ट मंडळाने भेट घेवुन वरिष्ठ पातळीवर पाठपुरवठा करुन समाजाला न्याय देण्याची जबाबदारी पार पाळावी अशी मागणी केली.
या वेळी मा.नगरसेवक अय्युब बागवान,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते खलील दादा देशमुख, राष्ट्रवादी कांग्रेसचे शहराध्यक्ष-अज़हर खान, भारतीय कांग्रेसचे शहराध्यक्ष-अँड. अमजद पठान, मा. नगरसेवक हाजी रसुल शेख, हाजी नसीर बागवान, मुख्तार शाह, माजी पं.स. सभापती-इस्माइल शेख, हाजी ऐजाज़ बागवान, शिवसेनेचे अल्पसंख्यक शहर संघटक-शाकीर बागवान, जारगांव ग्र. पं. सदस्य राजु शेख, डॉक्टर जाकीर देशमुख, मौलाना ज़ैद उमरी, शकील खान, सलीम शाह, हाजी मुजाहीद खाटीक, रउफ टकारी, वसीम बागवान, शरीफ खाटीक, इरफान मनियार, साजीद कुरैशी, आकीब शेख सर, जमील सौदागर, शकील पिंजारी, कैसर मिस्त्री व रईस बागवान सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते।