आज जागतिक चिमणी दिवस त्यानिमित्ताने दोन शब्द.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०३/२०२१
एकेकाळी आम्हाला आमची आई आम्ही रडत असलो तर चिमणी, कावळ्याच्या गोष्टी सांगायची चिमणीच घर मेणाच, कावळ्याच घर शेणाच तसेच चु, चु ये चारा खा पाणी पी अण भुर उडून जा अस म्हणताच रडणारे आम्ही लगेचच हसायला लागायचो मग अश्याच चिऊताईची आठवण करुन देतोय आज जागतिक चिमणी दिनानिमित्त आणि हो भविष्यात तुमच्या मुलांना हसत खेळत ठेवायच असेल तर चिऊताईला वाचवण्यासाठी प्रयत्न करा.
आज ‘जागतिक चिमणी दिवस’ आहे. चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत. का साजरा केला जातो चिमणी दिन, चिमणी नामशेष होण्याची कारणं काय? हे जाणून घेऊयात.. का साजरा केला जातो चिमणी दिन, चिमणी नामशेष होण्याची कारणं काय?
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटानं आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व अन् वैभव जपणं म्हणूनच गरजेचं आहे. सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील अनेक जाती तर इतिहासजमा झाल्या आहेत. ‘पासर डोमेस्टीकस’ (Passer Domesticus) अर्थातच ‘हाऊस स्पॅरो’ (House Sparrow) ही चिमण्यांची जात सर्व जगभरात आहे. जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या २६ पैकी फक्त २३ चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत. चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरातील तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झालीय. अन् यातूनच २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय.
चिमणी नामशेष होण्याची कारणे.
१) वाढते औद्योगीकरण अन त्यामुळे वातावरणात झालेला अमुलाग्र बदल आणि वाढलेले प्रदूषण.
२) शहरीकरण आणि त्यातून उदयाला आलेली ‘फ्लॅट संस्कृती’, आधीच्या काळात कौलारू घरं, त्यासमोर असणारी विहीर यामुळे चिमण्यांना आपले घर बनविणे अतिशय सोपे होते. बांधकामाची पद्धतीमूळे चिमण्यांच्या निवासावर संक्रांत.
३) शहरीकरणामुळे कमी झालेले जंगल. मोबाईल टॉवर्सची वाढलेली संख्या.
४) शेतीत वाढलेल्या रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या वारेमाप वापराने चिमण्यांचे प्रमाण कमी झाले. कारण शेतातील धन्य खाल्ल्याने चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे वाढलेले प्रमाण.
५) विणीच्या हंगामात चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास. वाहनं आणि गर्दीचा गोंगाट.
चिमण्यांना वाचविण्यासाठी हे करणे गरजेचे आहे.
१) उन्हाचा दाह वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे.
२) या पक्षांसाठी कमीत कमी दहा फुट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे.
३) पक्षांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने टाकणे.
४)उरलेले उष्टे अन्न चिमण्यांना टाकणे
भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी (नर- चिमणा, मादी-चिमणी) परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.तीला भारतात तपकीर असेही म्हटले जाते.
हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत, तसेच भारतभर सर्वत्र आढळतो . तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशांत आढळतो. भारतात काश्मिरी आणि वायव्यी अशा हिच्या किमान दोन उपजातीही आढळतात.
माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशके जगली.[१] त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी २३ वर्षे जगली.[२]
चिमण्यांच्या बाबतीत अशी एक वदंता आहे की, एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले, तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामधे घेत नाहीत व चोचीने मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात; प्रसंगी,जीव देखील घेतात.
अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत् चुंबकीय उत्सर्जन,[३] आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.[४][५]
२० मार्च हा दिवस दरवर्षी “जागतिक चिमणी” दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो.या काळात चिमणीची संख्या कमी होत आहे.मोबाईलमधुन येणाऱ्या लहरीमुळे यांना हाणी होत आहे.
रान चिमणी
शहरी भागात फारशी न आढळणारी चिमणी म्हणजे पीतकंठ चिमणी. याच चिमणीला रान चिमणी म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने नाशिक शहराबाहेरील जंगल परिसरात अढळते. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना एकदा एक मृत चिमणी आढळली होती. त्यांनी तिला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत नेऊन परीक्षण केले असता ती हाउस स्पॅरो नसल्याचा निष्कर्ष निघाला. या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो त्यामुळे या चिमणीला पीतकंठ म्हणतात तसेच ती रानात दिसून येते त्यामुळे तिला रान चिमणीही म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने हरसूल, पेठ, इगतपुरी या भागात आढळते. रान चिमणीही आता काहीअंशी कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चिमणीची शिकार. रानावनात गलोरने चिमणीची शिकार केली जाते. रानावनातील नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेले अज्ञान, तसेच काही ठिकाणी अशा पक्ष्यांचा अन्न म्हणूनही वापर केला जातो. त्यामुळे चिमण्यांना पारध केले जात असल्याने अशा चिमण्याही कमी होत चालल्या आहेत. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या ग्रामीण भागात यासंदर्भात जनजागृतीचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम सुरू आहे.
नर चिमणी
या चिमणीचे डोके राखाडी रंगाचे असते. तसेच तिचा गळा व डोळ्याभोवती काळा रंग असतो. ही चिमणी अंगाने भक्कम असते.
मादी चिमणी
ही चिमणी भुरकट राखाडी रंगाची असते. साधारणत: ताठ आणि सडपातळ बांधा या चिमणीचा बघायला मिळतो. चिमणीचा विणीचा हंगाम हा वर्षभर असतो.
चिमण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे, तरी आपण पर्यावरण वाचवू या आणि चिमण्या वाढवू या.
वरील माहिती गुगल व पुस्तकातून संग्रहीत केलेली आहे.