पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांच्या कारवाईत ४६ लाख ४८००० हजाराच्या गांजासह आरोपी अटकेत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/११/२०२२

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी उपनिरीक्षक अमोल पवार व इतर कर्मच्याऱ्यांना सोबत घेत अवैध धंद्याच्या विरोधात धडक मोहीम सुरु केली असून मागील काही दिवसांपूर्वी शिंदाड व गहुले शिवारातील गावठी दारुचे निर्मीती अड्डे उध्दवस्त केले तसेच कुऱ्हाड येथेही अवैध दारुच्या सुट्टीवर धाडसत्र राबण्यात आल्यामुळे अवैध धंदे करणारांची पायाखालची वाळू सरकली आहे.

तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे साहेब यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचत आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काल दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ बुधवार रोजी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे हद्दीतील सावखेडा शिवारातील सुभाष बाबूराव पाटील यांच्या मालकीच्या गट नंबर ६१/०१ मध्ये दुपारी एक वाजता छापा टाकला या छाप्यात सुभाष पाटील यांच्या शेतात गांजाच्या २०० झाडांची लागवड केल्याची आढळून आले ही झाडे उपटून ताब्यात घेण्यासाठी पोलीस कर्मचारी व काही स्थानिकांची मदत घेऊन ५८१ किलो गांजाची झाडे अंदाजे किंमत ४६,४८००० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन शेतमालक सुभाष बाबूराव पाटील यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी दिली असून या प्रकरणी आरोपी विरुद्ध एन. डी. पी. एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक २३ नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी एक वाजेपासून तर दिनांक २४ नोव्हेंबर गुरुवार रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती या कारवाईमुळे पंचक्रोशीतील गावागावातून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांचे कौतुक होत आहे.

सदर कारवाई माननीय पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस हवालदार रणजित पाटील, पोलीस नाईक अरुण राजपूत, पोलीस नाईक शिवनारायण देशमुख, पोलीस नाईक सचिन वाघ, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, अभिजित निकम, दीपक सोनावणे, प्रमोद वाडीले, अमोल पाटील, उज्वल जाधव, विकास पवार यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या