पठाणकोट येथे गोळी लागुन, सावखेडा बुद्रुक येथील जवानाचे निधन गावावर शोककळा.
-
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२२०२१
पाचोरा तालुक्यातील सावखेडा गावचे सुपुत्र, ७३४ TPT WKSP मध्ये कार्यरत जवान नायक मंगलसिंग जयसिंग परदेशी यांचे आज दिनांक १४ नोव्हेंबर, २०२१ रविवार रोजी पहाटे १.४० वाजता पठाणकोट येथे बंदुकीची गोळी लागल्यामुळे निधन झाले आहे.
शहीद मंगलसिंग यांच्या पाश्चात्त्य एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे
मंगलसींग परदेशी हे निधन झाल्याची वर्ता कळताच वरखेडी, डांभूर्णी, पिंप्री, पिंपळगाव हरेश्वर, कुऱ्हाड, लासुरे, अंबे वडगाव, लोहारी, शिंदाड आसपासच्या जवळपासच्या गावात शोकमय वातावरण झाले आहे.
पाचोरा तालुक्यातीचे आमदार, माजी आमदार, पंचायत समितीचे सदस्य मा.श्री. मधुकर काटे वरखेडीचे मा.श्री. ज्ञानेश्वर सोनार व इतर लोकप्रतीनिधींनी त्याचे दैनंदिन कार्यक्रम त्वरित थांबवून सावखेडा गावात हजेरी लावत जवानाच्या कुटुंबीयांच्या दुख्खात सामिल झाले आहेत. पाचोरा येथील मा.श्री. अमोलभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठरलेले कार्यक्रम जवळपास थांबवण्यात आले असून तेही सावखेडा गावाकडे निघाल्याचे समजते.
सावखेडा परिसरात शोकमय वातावरणात तयार झाले आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)