भडगाव येथे काटेकोरपणे पालन करत जनता कर्फू यशस्वी.

श्रीराम पाटील.भडगाव (वार्ताहर)
संपूर्ण महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मानवी साखळी खंडित करणे हा एकमेव प्रभावी पर्याय असल्याने शासन, प्रशासनाने याकरिता जनतेच्या सोयीनुसार जनतेच्या दैनंदिन दिनचर्येचा आढावा घेत सरसकट लॉकडाऊन न करता काही बाधित क्षेत्रातील गावांमध्ये तिन दिवसाचा जनता कर्फू लागु करून कोरोनाचा प्रसार होऊनये म्हणून उपाययोजना राबत आहेत. याचाच भाग म्हणून पाचोरा, भडगाव तालुक्याचे प्रांताधिकारी मा.श्री. राजेंद्रजी कचरे साहेब यांनी भडगाव शहरासाठी दिनांक १९ मार्च शुक्रवार ते २१ मार्च रविवार पर्यंत जनता कर्फू जाहीर केलेला असून जनतेने यात सामिल होऊन जनता कर्फूला सहकार्य करावे असे अवाहन केले होते. तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालुन विनामास्क फिरणाऱ्यावर तसेच सामाजिक अंतर न राखल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले होते.
तसेच जनता कर्फूच्या कालावधीत भडगाव शहरातील दवाखाने, औषधालय, दुध डेअरी वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येतील असे जाहीर केले होते. या आदेशानुसार भडगाव शहरातील सर्व व्यवसाउक व जनतेने चांगल्याप्रकारे प्रतीसाद देत आपपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करत जनता कर्फू शंभर टक्के यशस्वी करुन दाखवला असून अजून एक दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
या तिन दिवसाचा जनता कर्फू यशस्वीपणे पाळलाजावा म्हणून भडगाव येथील तलाठी तायडे आप्पा,योगेश ब्राह्मणे,विजय पाटील , पोलीस जिजाबराव पवार,नगरपालिका गणेश नरवाडे, पत्रकार श्रीराम पाटील हे भडगाव शहर व परिसरात अथक परिश्रम घेत आहेत.