वरखेडी येथे विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, हजारो रुपयांच्या उपकरणांची होळी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१०/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील ग्रामस्थ विजयादशमीचा उत्सव एकमेकांना शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात साजरा करत असतांनाच रात्री ०९.१५ ते ०९.३९ वाजेच्या दरम्यान विद्यूत पुरवठ्यात अचानक बिघाड झाल्यामुळे डॉक्टर भावसार यांच्या दवाखान्या पासून राममंदिर परिसर, चंदिले मेडिकल व पोलिस पाटील यांच्या गल्लीमध्ये अचानकपणे जोरदार आवाज होऊन विद्यूत पुरवठा खंडित झाला.
विद्यूत पुरवठा खंडित होताच बऱ्याचशा घरातील ट्यूब लाईट, टिव्ही, बल्ब पंखे जळून खाक झाले. तर एका व्यवसायीकाचे घरातील मोबाईल चार्जरचा स्फोट झाल्यामुळे त्या घरात व परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले होते असे खात्रीपूर्वक समजले आहे.
या तांत्रिक बिघाड होण्यामागील कारण जाणून घेतले असता वरखेडी गावात टाकण्यात आलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा जीर्ण झाल्या असून या तारा बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोंबकळत असल्यामुळे जोरात हवा अल्यावर ह्या तारा (विद्युत वाहिन्या) एकमेकाला लागून शॉर्टसर्किट होऊन वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो.
तसेच विद्युत पुरवठा सुरळीत पणे सुरु व्हावा व विद्युत पुरवठा यात काही बिघाड झाल्यास त्वरित विद्युत पुरवठा खंडित होण्यासाठी जे कट आउट बसवण्यात आले आहेत त्यात तंत्रशुद्ध पद्धतीने फ्यूज तारा न टाकता त्या ठिकाणी विद्युत वाहिनीच्या जाड तारा टाकल्यामुळे विद्यूत पुरवठ्यात काही बिघाड झाल्यास कट आउट मधून विद्यूत पुरवठा खंडित होत नाही. या कारणांमुळे विद्यूत ग्राहकांच्या घरातील विद्यूत उपकरणे जळून खाक होतात. तसेच विद्यूत ग्राहकांचे हजारो रुपयांचे नुकसान होते.
म्हणून आतातरी विद्यूत वितरण कंपनीने लक्ष देऊन विद्यूत वाहिनीच्या जिर्ण तारा बदलवून लोंबकळत असलेल्या तारांची व झुकलेल्या विद्यूत खांबांची दुरुस्ती करावी तसेच कट आऊट मध्ये फ्यूज तार टाकावेत म्हणजे यापुढे अशी घटना घडणार नाही असे वरखेडी ग्रामस्थांचे म्हणने आहे.