तौकी वादळातुन बचावलेल्या वैभव पाटील याचा वाघ परिवारातर्फे सत्कार.

स्वप्नील कुमावत(पाचोरा)
दिनांक~२३/०५/२०२१
पाचोरा शहरातील गोविंद नगरी येथील रहिवासी श्री.माधवराव पाटील. यांचा एकुलता एक मुलगा वैभव पाटील (गोलु) मर्चेन्ट नेवी मुंबई येथे नोकरिला असून आता काही दिवसापूर्वी कंपनीच्या कामानिमित्त समुद्रमार्गे जहाजाव्दारे प्रवास करत असतांनाच तौक़ी चक्रीवादळमुळे त्यांचे जहाज समुद्रात अडकले होते. या चक्रीवादळाशी सतत ०८ तास संघर्ष करत एकप्रकारे मृत्युशी झुंज सुरु असतांनाच नशीब तुझ्या बलवत्तर म्हणून शेवटच्या क्षणी इंडियन नेव्हीचे जहाज त्यांच्याजवळ पोहचले व जहाजावर अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यात यश आले.
या नशिबवान प्रवाशांपैकी पाचोरा शहरातील माधवराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा वैभव हा दोन दिवसांपूर्वी येथे घरी आल्याची शुभवार्ता माहीत पडताच पाचोरा शहराचे नगरसेवक तसेच पी.टी.सी.शैक्षणिक संस्थेचे चेअरमन नानासाहेब मा.श्री. संजयजी वाघ यांनी मा.श्री. माधवराव पाटील यांच्या घरी जाऊन वैभव पाटील याचा सत्कार करुन विचारपूस केली व भावि आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मा.श्री.संजयजी वाघ यांच्या सोबत श्री. हरुण देशमुख,शिक्षक श्री. राहुल पाटील सर,श्री. सुभाष गोसावी सर,श्री. आर.डी. पाटील सर,निलेश पाटिल(सोनु)व परिवारातील सदस्य आदी उपस्थित होते.
चौकी वादळात जहाज सापडल्यानंतर काय व कशी भयवाह परिस्थिती होती समोर वादळाच्या रुपात प्रत्यक्ष यमदूत उभा ठाकला होता आई,वडील परिवारातील सगळ्याचे चेहेरे डोळ्यासमोर येत होते. आपले जगणे आता शक्यच नाही असे वाटत होते. परंतु मला माझ्या काही चांगल्या कर्माचे फळ व आपल्यासारख्या मित्रांचा व जनतेचा आशिर्वाद कामी आला देवाच्या कृपेने आम्ही वाचलो असे मत वैभव पाटील यांनी व्यक्त केले परंतु वैभव पाटील यांनी घडलेला प्रसंगाचे वर्णन सांगतांना त्यांच्या चेहेऱ्यावरील बदलते हावभाव व पाणावलेले डोळे त्यावेळची परिस्थिती ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला होता.