कुडाळ मध्ये उद्या भव्य रोजगार मेळावा
कुडाळ
व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेंशिअल या कंपन्यांतर्फे उद्या कुडाळ-एमआयडीसी येथे दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडीत जसा रोजगार मेळावा झाला त्या प्रमाणेच या मेळाव्यात सुद्धा नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्याद्वारे तरुणांना नक्कीच त्यांच्या पात्रतेप्रमाणे रोजगार उपलब्ध होणार आहेत.
आजकालच्या तरुणांपुढे मोठे आव्हान आहे ते रोजगाराचे. येथील मुलांकडे पात्रता आहे, तरीसुद्धा त्यांना मुंबई-पुण्याकडे जावे लागते किंवा रोजगाराची गोव्याची तरी वाट धरावी लागते. त्या ठिकाणी मोठी स्पर्धा असल्याने येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. याच गोष्टीचा विचार करून येथील तरुणांना येथेच किंवा गोव्यात त्यांच्या पात्रतेप्रमाणे रोजगार मिळावा यासाठी व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेंशिअल या कंपन्यांतर्फे यापूर्वी सावंतवाडीत रोजगार मेळावा घेण्यात आला होता. त्या मेळाव्याला फॉर मोठा प्रतिसाद लाभला होता. अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन चांगल्या कम्पन्यान्मधे रोजगार मिळाला देखील आहे. त्याच वेळी संपूर्ण सिंधुदुर्गात अशाप्रकारचे मेळावे आयोजित करण्यात येतील असे जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे उद्या २१ फेब्रुवारी २०२३ रोजी कुडाळ एमआयडीसी मध्ये अग्निशमन केंद्रानजीक भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत हा रोजगार मेळावा होणार आहे.
कोकणातील तरुण, महिलांसाठी काही उपक्रम राबवावेत, या उद्देशानेच व्हरेनियम क्लाऊड ही कंपनी काम करत आहे. पुढच्या काळात सुद्धा विविध प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून कोकणात राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती कंपनीचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी दिली. तरी जास्तीत-जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांचा वतीने करण्यात आले आहे.
अलिकडेच सावंतवाडी येथे झालेल्या रोजगार मेळाव्याला फॉर चांगला प्रतिसाद मिळाला होता. व्हारेनियम कंपनीने तात्काळ २० जणांना नियुक्तीपत्र दिली होती. कुडाळ येथे होणाऱ्या मेळाव्यात येणाऱ्या कंपन्या या मुंबई पुणे गोवा येथीलही असतील त्यामुळे ज्यांना जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी जॉब दिले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता व आलेल्या कंपन्या यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना त्या त्या ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहेत, कंपनीच्या वतीने लवकरच रोजगार मेळाव्या बरोबरच आणखी सुद्धा इतर प्रकल्प कोकणात येणार आहेत. आणि या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून येथील तरुणांच्या हाताला काम दिले जाईल अशी माहिती कंपनीचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या कुडाळ येथे आजच सर्वात मोठे हायड्रा हे डाटा सेंटर उभारण्यात आले आहे हे भारतातील महत्वाचे सेंटर ठरणार आहे. . याद्वारे स्थानिकांना तसेच कोकणातील नागरिकांना रोजगार प्राप्त होईल. तसेच २७ डिसेंबर २०२२ रोजी गोवा – पणजी येथे सुरू झालेल्या डाटा सेंटर मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.
गेल्या काही वर्षात ऍडमिशन सेंटरने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्प राबवले आहेत यात कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान घेतलेले नाही . कंपनी स्वतःच्या खर्चातून हे सगळे उपक्रम राबवत आहे. मुंबई विद्यापीठाला सुद्धा मोफत जागा उपलब्ध करून दिलेली आहे. हे करत असताना कोणत्याही प्रकारच सरकारी अनुदाना न घेता ऍडमिशन सेंटर हे प्रकल्प राबवत आहे. अशाच प्रकारचे प्रकल्प भविष्यातही राबविणायत येणार आहे. कोणत्याही प्रकारची सरकारी अनुदान घेणं हा कंपनीचा उद्देश नाही तर इथल्या तरुणांना काम देणे या एकमेव उद्देशाने कंपनी काम करत असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे अस नम्र आवाहन कंपनीचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी केल आहे.
दरम्यान कुडाळ एमआयडीसी येथे दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत होणाऱ्या भव्य रोजगार मेळाव्यात जास्तीतजास्त तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेंशिअल या कंपन्यांतर्फे करण्यात आले आहे.