कुडाळ येथे २६ फेब्रुवारी रोजी युवा महोत्सवाचे आयोजन

कुडाळ
धीरज परब मित्र मंडळाच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी युवा महोत्सवाचे आयोजन कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
धीरज परब मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात यावर्षी या मंडळाच्या वतीने युवा महोत्सव घेण्यात येणार आहे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना व्यासपीठ मिळावे या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवामध्ये समूह नृत्य स्पर्धा, स्कीट स्पर्धा, एकेरी नृत्य स्पर्धा, एकेरी गायन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे या महोत्सवात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही अधिक माहितीसाठी सचिन गुंड (9637833638) व वेदांग कुडतरकर (8329951261) येथे संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.