शिवजयंती जयंतीनिमित्ताने कापूसवाडी येथे श्री. संतोष पाटील. (अंबे वडगावकर) यांचे शेतीविषयक मार्गदर्शन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२३
महाराष्ट्राचे कुलदैवत शेतकऱ्यांचा राजा श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जामनेर येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीने यावर्षी एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन लाभावे म्हणून जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथे दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील शेतकरी लेखणीचे शिलेदार कविवर्य मा. श्री. संतोष पाटील यांना आमंत्रित करण्यात आले असून ते शेतकऱ्यांना शेतीविषयक मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे हे शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर मा. श्री. दिलीप खोडपे. (सर) यांच्या अध्यक्षतेखालील व निमंत्रण मा. ना. श्री. गिरीश भाऊ महाजन, मा. श्री. संजयदादा गरुड यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व शिवप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.