वारिशे खुनाच्या निषेधार्थ ओरोस फाटा येथे ‘तोंड बंद आंदोलन’

ओरोस

रिफायनरी प्रकल्पाविरोधी भुमिका घेणारे राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने उद्या शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी ‘तोंड बंद मुक आंदोलन’ करण्यात येणार आहे. ओरोस फाटा येथील छ. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकाळी १० ते दुपारी १ या वेळात हे आंदोलन होत आहे.

जिल्ह्यातील सजग नागरिक, स्वयंसेवी संस्था यांचे अनौपचारिक व्यासपीठ असलेल्या ‘आम्ही सारे भारतीय’ मंचाने सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व मुख्यालय पत्रकार संघाच्या सहकार्याने हे आंदोलन आयोजित केले आहे. छ. शिवाजी महाराजांना वंदन करुन, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन आंदोलन सुरु होईल. मुक आंदोलन असल्याने कोणाचेही भाषण होणार नाही. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे. आंदोलनाचे चार तास सकस वाचनासाठी खर्च करायचे असुन प्रत्येकाने सोबत पुस्तक आणावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या