सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

माझा सिंधुदुर्ग
Home›माझा सिंधुदुर्ग›भेदभाव आणि असमानता या शब्दांचा अर्थ घरामध्ये शोधा:- आनंद पवार

भेदभाव आणि असमानता या शब्दांचा अर्थ घरामध्ये शोधा:- आनंद पवार

By SURAJ DEOHATE
February 15, 2023
1
0
Share:
Post Views: 92
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

कुडाळ

भेदभाव, असमानता हे शब्द जरी मोठी असले तरी या शब्दांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचा आहे मुळात आपल्या घरापासून भेदभाव, असमानता याचा अर्थ आणि घरात होणाऱ्या घडामोडी यामधून शोधल्या पाहिजेत असे मत सम्यक संस्थेचे आणि पुरुष मास्टर ट्रेनर या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आनंद पवार यांनी कुडाळ येथे व्यक्त केले. 

कुडाळ येथील दुर्वांकुर हॉल येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पुरुष मास्टर ट्रेनर अशी लिंगसमभाव सचेतना कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा तीन दिवसाची आहे. शुभारंभ प्रसंगी महिला बाल विकास विभागाचे काटकर, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, महिला आर्थिक विकास महामंडळाचे काळे, मार्गदर्शक आनंद पवार, संस्थेच्या अध्यक्षा मानसी धुरी तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयोगिनी उपस्थित होते. पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी या कार्यशाळेचे मार्गदर्शक आनंद पवार यांनी सांगितले की, कुठेही परिवर्तन हे स्वतःच्या घरापासून सुरू होत असतं लिंग समभाव सचेतना कार्यशाळा का घ्यावी लागली याचा सुद्धा विचार झाला पाहिजे महिला विविध मार्गातून प्रगती करत आहेत नोकरी, व्यवसाय, राजकारण अशा प्रमुख ठिकाणी त्या काम करत आहेत हे परिवर्तन झाले आहे. पण मानसिक स्थितीतून परिवर्तन झाले आहे का? याचा विचार झाला पाहिजे आणि त्यामुळेच लिंग समभाव सचेतना ही कार्यशाळा त्यासाठी आहे. आपण सर्व समान आहोत जशा पुरुषाला भावना आहेत अशा महिलेला भावना आहेत आणि एकामेकाच्या भावना जपणं एकामेकाला सहकार्य करून प्रगती करणे म्हणजेच लिंग समभाव मात्र अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा आपण दिंडोरा पिटत आहोत हे कुठेतरी कमी झाले पाहिजे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार देण्यात आला आहे भेदभाव आणि असमानता याचे अर्थ समजावून घेणे महत्त्वाचे आहे त्यावेळीच समानता आणि समभाव नांदू शकतो असे त्यांनी सांगितले.

तर यावेळी माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सांगितले की, पुरुष आणि स्त्री हा नैसर्गिक लिंग भेद असला तरी समभाव निर्माण करणे हे आपल्या हाती आहे तसाच तिसरा वर्ग हा तृतीयपंथी आहे त्यांच्याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. समाजात अजूनही पुरुषी अहंकार आहे तो कमी झाला पाहिजे समाज काय म्हणेल या वाक्याने सर्वांच्या जीवनाची राख रांगोळी झाली आहे समाज काय म्हणेल यापेक्षा आपण काय करतो याकडे लक्ष देणे आणि त्याची सुरुवात करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. संस्काराचे कारण पुढे करून अनेक जुन्या रुढी, परंपरा अंगीकारल्या जात आहेत किंवा त्या लादल्या जात आहेत हे चुकीचे आहे. समाजामध्ये परिवर्तन हे झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर महिला बाल विकास विभागाचे काटकर यांनी सांगितले की, अनेक कायदे महिलांसाठी आहेत आणि त्या कायद्यांच्या माध्यमातून महिला न्याय मिळू शकतात आणि त्यासाठीच अशा प्रकारचे उपक्रम शासन हाती घेत आहे. महिलांचा जेव्हा सर्वांगीण विकास होईल तेव्हाच मानवी निर्देशांक वाढेल असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे श्री. काळे यांनी केले या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील सुमारे ३० पप्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

वालावल येथे आरोग्य शिबिर संपन्न

Next Article

संतोष मर्गज यांच्या ‘रिमझिम पाऊसधारा” व्हिडीओ चाहत्यांच्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

SURAJ DEOHATE

Related articles More from author

  • माझा सिंधुदुर्ग

    पूर्वा गावडेची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड 

    February 8, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यात होणार धुमधडाक्यात जयंती साजरी

    February 16, 2023
    By SURAJ DEOHATE
  • अग्रलेखमाझा सिंधुदुर्ग

    ‘ते’ राणेंच करू शकतात

    February 16, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

    February 15, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    कर भरा ; अन्यथा जप्तीच्या कारवाईला सामोरे जा

    February 10, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    अनधिकृत वाळू व्यावसायिकांच्या विरोधात महसूलची कठोर पावले

    February 7, 2023
    By SURAJ DEOHATE

You may interested

  • आपलं जळगाव

    जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.

  • कृषी विषयक

    पाचोरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, रमेशचंद्रजी बाफना.

  • शैक्षणिक

    श्रीकृष्ण विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज