बांबरुड कोव्हिड सेंटर येथिल खरे वास्तव समोर रुग्णाची होते अवहेलना.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०३/२०२१
पत्रकार दीपक गढरी यांनी बांबरूड येथील कोव्हिड सेंटरला भेट देऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली असता खूप संताप जनक प्रतिक्रिया येथील रुग्णांनी दिल्या या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना अगदी निकस आहार दिला जातो. तसेच तसेच अंडी, दुध किंवा इतर पौष्टिक आहार दिला जात नाही.म्हणून जेवण चांगले मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत मिळत असलेल्या सुविधा अपूर्ण असल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या.
कोविड सेंटरमध्ये पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी मिळत नसल्याचे सांगितले तसेच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह, तसेच अंघोळीसाठी स्वतंत्र स्नानगृहाची व्यवस्था नसून कपडे बदलवण्यासाठी सुरक्षित जागा नाही. तसेच डॉक्टर नियमित येत नसून चार, चार दिवसांपासून डॉक्टरांचे तोंड सुद्धा दिसत नसल्याचे सांगत औषधोपचार वेळोवेळी मिळत नसल्याने संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबाबत माननीय प्रांताधिकारी, आमदार किशोर आप्पा पाटील व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन तेथील रुग्णांची हेळसांड थांबवावी अशी मागणी होत आहे.